ज्योतिबा पोटे, मारेगाव: विजबिलात पारदर्शकता यावी यासाठी मीटरचा फोटो काढण्याची पद्धत सध्या विज वितरण कंपनी वापरते. बिलात रिंडिंगचा फोटो असल्याने ग्राहकही त्याची खात्री न करता बिल भरतात. कारण फोटो असल्यावर रिडिंग बरोबरच असेल असा त्याचा समज असतो. मात्र मारेगावात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. त्यांच्या मीटरमध्ये रिडिंग वेगळे दाखवत आहे. तर त्यापेक्षा अधिक रिडिंग बिलात असलेल्या फोटोत दाखवण्यात आला आहे.
मारेगाव येथील पारखी कृषी केन्द्राच्या संचालकाला या महिन्याचे चालू विज बिल हाती पडले. त्यांना शंका येताच त्यांनी विज बिलाचे रिंडिंग आणि बिलातील रिडिंग तपासून पाहिले. तर त्यात वीस युनिटचा फरक दिसून आला. त्यामुळे पुन्हा एकदा विजवितरण कंपनीचा गलथानपणा समोर आला आहे.
या प्रकारामुळे त्यांनी संबंधित विभागात जाऊन चौकशी केली असता त्यांना त्यातील युनिटचा फरक न काढता यावेळी तुम्ही बिल भरा, पुढच्या वेळी हे युनिट कमी करुन मिळेल असे कामचलाऊ उत्तर देण्यात आले. मात्र रिडिंग कमी असताना जास्त बिल भरणा करण्याचा मनस्ताप त्यांना सहन करावा लागतोय.
मारेगाव येथील पारखी कृषी केन्द्राचे बिलात चालु रिडिंग १३५१ आहे. तर मीटर मध्ये बिलातल्या फोटोत चालु रिडिंग १३२१ युनिट दाखवत आहे. विजवितरण कंपनीचा गलथान पना लक्षात येत असल्याने त्यांच्या गलथानपना सामान्य ग्रहाकासाठी आर्थिक फटका ठरत आहे. यांची संबंधित विभागाने दखल घेन्याची गरज आहे, असे पारखी कृषी केन्द चालक कुंदन पारखी यांचे म्हणणे आहे.
Attachments area