एमएच 29 हेल्पिंग हॅन्ड तर्फे 2 वन्यजिवांना जीवनदान

घुबड आणि हरीण आढळले होते जखमी अवस्थेत

0

नागेश रायपुरे, मारेगाव: राळेगाव तालुक्यातील हेल्पिंग हॅन्ड्सचे प्राणी मित्र संदीप लोहकरे यांनी एक दिवसा आड दोन वन्य जीवांना जीवदान दिले आहे. त्यांना एक घुबड जखमी अवस्थेत आढळले होते. तर एक काळविट कुत्र्यापासून बचाव करत जखमी अवस्थेत फिरत होते. या दोन्ही जिवांना एमएच 29 हेल्पिंग हॅन्डच्या चमुद्वारे रेस्क्यू करण्यात आले. सध्या जखमींवर वर्धा येथे उपचार सुरू आहे. 

राळेगाव येथील गेस्ट हाऊस येथून दुपारच्या वेळेस MH 29 हेलपिंग हॅन्ड्सचे तालुका अध्यक्ष संदीप लोहकरे यांना प्रवीण वडतकर यांनी फोन करून कळविले कि एक गव्हाणी घुबड (indian barn owl) जखमी अवस्थेत रेस्ट हाऊसमध्ये आडोसा घेऊन बसल्याची माहिती दिली. तेव्हा हेल्पिंग हॅन्ड्सचे मेंबर त्वरित त्या ठिकाणी पोहचून त्या घुबडाला आपल्या ताब्यात घेतले.

घुबडाची तपासणी केली असता त्यांना तो घुबड गंभीररीत्या जखमी झालेला आहे. नंतर त्या घुबडाला राळेगाव येथे प्रथमोपचार केल्यानंतर वनविभागाला सोबत घेऊन जंगलात सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र घुबडाच्या पंखाला इजा झाल्याने त्याला उडता येत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी त्या घुबडाला वनविभागाच्या मदतीने पुढील उपचारासाठी वर्धा येथे पाठवले. सध्या त्या घुबडावर उपचार सुरू आहे.

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता MH 29 हेलपिंग हॅन्ड्स च्या टीम ला फोन आला कि एक हरीण (काळविट) हे कळपापासून भटकून राळेगाव येथील पोलीस स्टेशन परिसरात कुत्र्यांपासून स्वतःचा जीव वाचवत भटकत आहे. माहिती मिळताच चमूतील आदेश आडे यांनी त्या हरणाला पकडले. तो खूप जखमी अवस्थेत त्या ठिकाणी होता.

संदीप लोहकरे यांना ही मिळताच त्या ठिकाणी गेले व त्यांनी लगेच वनविभागाशी संपर्क साधून त्याला राळेगाव येथील वैद्यकीय दवाखान्यात प्रथमोपचारा साठी नेले. हरणाला प्रथमोपचार देण्यात आले. पण त्याला जास्त इजा झाल्याने त्याला चालत येत नाही आहे. आता सध्या तो दोन दिवस देखरेखीमध्ये होते. हरणाला देखील पुढील उपचारासाठी वर्धा येथे पाठविण्यात आले आहे. MH 29 हेल्पिंग हॅन्ड्स हि संस्था गेल्या 5 वर्षांपासून राळेगाव तालुक्यात कार्यरत आहे. त्यांनी अनेक वन्यजीव व मुक्या प्राण्यांचे जीव वाचवले आहे.

हे देखील वाचा:

जेव्हा तिच्या सायकलीला अचानक बिबट्या क्रॉस करतो…

वणीत आणखी एका दुकानावर पथकाची कारवाई

Leave A Reply

Your email address will not be published.