जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून वणी व परिसरात मुंबई, पुणे, औरंगाबाद इत्यादी शहरातून मोठ्या प्रमाणात लोकांचे आगमन सुरू आहे. यात विद्यार्थी, तसेच नोकरीनिमित्त असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. तर मुंबई हॉटस्पॉट ठरल्याने काहींनी कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून ग़ड्या आपला गावच बरा असे म्हणत आपल्या गावकडे धाव घेतली आहे. मात्र प्रशासनाकडून या येणा-या लोकांची कोणताही तपासणी न करता त्यांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारला जात आहे. या भोंगळ कारभारामुळे वणीकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अखेर या विषयावर वणीतील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व सुजान नागरिकांची मिटिंग झाली असून आज सोमवारी याबाबत निवेदन सादर केले जाणार आहे.
बाहेरून वणीत आलेल्या लोकांसाठी विशेष व्यवस्था केलेली नाही. कोविड केअर सेंटरमध्ये बाहेरून आलेले लोक स्वतःहून तपासणीसाठी जात आहे. मात्र त्यांची देखील योग्य ती तपासणी केली जात नाही. आरोग्य विभाग केवळ जुजबी विचारणा करून त्यांच्या हातावर शिक्के मारून इतके लोक होम कॉरेन्टाईन आहे, तितके लोक होम कॉरेन्टाईन आहे असे कागदी घोडे नाचवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या विषयावर वणीकरांमध्ये सोशल मीडियातून चिंता व्यक्त करण्यात येत होती. अखेर याबाबत वणीतील व्हॉट्स वरील ‘मिशन निर्गुडा’ या गृपमधील मेंबरने पुढाकार घेतला. रविवारी दुपारी 12 वाजता वसंत जिनिंगमध्ये या विषयावर सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व सुजाण नागरिकांची मिटिंग झाली. यानुसार चर्चा होऊन आज 12 वाजता याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे.
बम्बईसे आया मेरा दोस्त, दुरसे सलाम करो…
बम्बईसे आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो. रात को खाओ पीओ, दिन को आराम करो. 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आप की खातिर’ या चित्रपटात मुंबईकर मित्रासाठी अर्पीत झालेले हे गाणे त्याकाळी प्रचंड गाजले. आज ही या क्रेज दिसून येते. डीजे, बँडवर आजही हे गाणे वाजवले जाते. मात्र आज कोरोना संसर्गामुळे आपल्या परिसरात अनेक मुंबईकर पुणेकर आपल्या गावाकडे आल्याने क्वारंटाईन होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता बंबई से आया मेरा दोस्त, लेकिन दोस्त को दुरसे सलाम करो असे म्हणावे लागत आहे.
मुंबई पुण्यातील नागरीकांना कोरोनाच्या दक्षतेबाबत गावाकडे सर्शत अटीवर येण्याची परवानगी दिली जात आहे. अशा स्थितीत अनेक मुंबई पुण्याची मंडळी गावाकडे येऊ लागली आहेत. मुळातच ग्रामीण भागातील बहुतांशी गावातील लोक नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत स्थिरावले आहेत. गणेशोत्सव, दिवाळी, लग्न इत्यादी कार्यक्रमात या मुंबई पुणेकरांची आवर्जून उपस्थिती असते. ग्रामीण भागाच्या सर्व घडामोडीत मुंबई व पुणेकरांना महत्त्वाचे मानले जाते.
प्रशासनाच्या सशर्त परवानगीने मुंबईकरांना गावाकडे येऊ दिले जात आहे. गावाकडे आल्यानंतर होम क्वारंटाईन अथवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची प्रमुख अट त्यामुध्ये असल्याचे दिसून येते. शहरातील व तालुक्यातील अनेक ठिकाणी असे मुंबईकर दाखल होत आहेत. आज कोरोनामुळे या मित्रमंडळींना केवळ आपल्या कुटुंबासमवेत गावाकडे यावे लागत आहे. आधी त्यांना आणालया मित्रमंडळी यायची. परत आल्यावर काही दिवस पार्टी, भेटीगाठी यात रंगायचे. मात्र आता अशा लोकांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का असल्याने दोस्त को दुरूनच सलाम करण्यात येत आहे.
आजूबाजूच्या कोरोनाबाधित जिह्यातून चोरट्या मार्गाने प्रवेश?
सीमाबंदी असतांनाही लगतच्या कोरोनाबाधित जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने ये-जा सुरुच आहे. बाहेर जिल्ह्यातून येणा-पासूनच आता धोका असल्याने त्यांना रोखण्यासाठी प्रशासनाकडून चोरट्या मार्गाचा शोध घेऊन तेथे नाकाबंदी करणे गरजेचे झाले आहे. या सर्व तपासणी नाक्यांवर दोन-दोन शासकीय कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून शहरात व तालुक्यात प्रवेश करणे अवघड झाले पाहीजे. सद्यस्थितीत शहरात अधिकतर मुंबई व पुणे वरून येणा-यांच्या संख्येत वाढ होत आहे. तेव्हा नागरिकांनी तसेच प्रशासनाने अलर्ट राहणे आवश्यक आहे.
वणी बहुगुणी आता टेलीग्रामवर आहे. आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडी मिळवा.