वीजेच्या धक्याने दूध विक्रेत्याचा मृत्यू

0
राजू कांबळे, वणी: आज रविवारी सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान एका दूध विक्रेत्याचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कवडू वासूदेव दहेकर असं या दूध विक्रेत्याचं नाव असून ते नायगाव येथील रहिवाशी आहेत.
कवडू वासूदेव दहेकार (58) हे दूध विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या कडे एक म्हैस व दोन गायी असून त्यांच्या पासून मिळणा-या दुधापासून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. ते दूध विक्रीसाठी दररोज सकाळी साडेसात वाजता नायगाव वरून वणीला येतात. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे दुध विक्रीसाठी वणीला आले होते. दरम्यान साडे आठ वाजताच्या दरम्यान ते नांदेपेरा रोड येथील विजय कवरासे यांच्या घरी राहणा-या किरायेदारांना दूध वाटण्याकरीता आले होते.
घरी कपडे वाळू घालण्याचा तार दोन खिळ्यांना बांधण्यात आला होता. त्या खिळ्याला एक इलेक्ट्रिक वायर गुंडाळलेला होता. हा वायर मध्येच कटून असल्याने त्या खिळ्याच्या माध्यमातून विद्युत प्रवाह तारामध्ये आला होता. दरम्यान कपडे वाळू घालण्याच्या ताराला त्यांनी स्पर्श केला. त्या तारांमध्ये विद्युत करंट असल्याने कवडू लगेच धक्का लागून खाली पडले व यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्यांचा हात पूर्ण पणे जळाला होता. या घटनेची माहित लगेच त्यांचा मुलगा आशिष यांना फोन करून देण्यात आली. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांना तिथे मृत घोषीत करण्यात आले. अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.