मार्की (बु) येथील लाखो रुपयांचा आरो फिल्टर धूळखात

उन्हाळा गेल्यानंतर थंड पाणी मिळेल का? गावक-यांचा सवाल

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (बु) ग्रामपंचायतमध्ये ग्रामवसीयांना शुद्ध पाणी मिळण्याकरिता शासनाने लाखो रुपये खर्च करून आरो फिल्टर मशीन लावले. मात्र ठेकेदारांच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे 6 महिन्यांपासून आरो मशिन धूळखात आहे. त्यामुळे उन्हाळा गेल्यावर थंड पाणी मिळणार का? असा संतप्त सवाल गावकरी विचारीत आहे.

तालुक्यातील बहुतांश गावातील पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार असल्यामुळे लहान मुलापासून तर वयोवृद्ध पर्यंत लिखाण किडनी स्टोन (मुतखडा) हाडे ठिसूळ होणे, हाडांचा त्रास, जॉइण्ड पेन व इतर अनेक आजाराला बळी पडावे लागत होते. याच अनुषंगाने ग्रामपंचायत पातळीवर शुद्ध आरो प्लांट लावून गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्याचा मानस होता परंतु यावरही हरताळ फासल्याने चित्र दिसत आहे.

तालुक्यातील मोठया लोकसंख्येच्या बाबतीत मार्की (बु) समावेश आहे. गावात क्षारयुक्त दूषित पाण्यामुळे गावात मोठ्या प्रमाणत आरो फिल्टरचे पाणी विकत घेऊन पिण्यासाठी नागरिक वापरात आहे. मार्की येथील जुणे असलेल्या आरो फिल्टरमध्ये फिल्टर करण्याची क्षमता कमी आहे व योग्यतेनुसार पाणी फिल्टर होत नसल्याचे गावातील नागरिकात ओरड सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी हे मुबलक प्रमाणात मिळत नाही.

ग्रामवासीयाना पाणी मुबलक प्रमाणात आरो फिल्टरच्या पाणी मिळत नसल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून खनिज विकास निधीतून मार्की (बु) येथे एक नवीन आरो प्लांट देण्यात आला. त्याचे काम अनेक महिन्यापासून रखडले आहे.

काही महिन्यांपूर्वी संबधित ठेकेदारांनी लाखो रुपयांचे आरो मशीन व उपकरणाची फिटिंग सुद्धा केली. पण आरो प्लांट सुरू केला नाही. मात्र उन्हाळा संपत आला तरी सुद्धा नागरिकांना थंड पाण्याचा आस्वाद घेता आला नाही. आरो प्लांट अनेक महिन्यापासून सुरू होत नसल्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

काही वर्षाआधी सुद्धा अशाच प्रकारे ग्रामपंचायत निधीतून आरो फिल्टर प्लँट मशीन लावण्यात आले होते. परंतु आरो फिल्टर सुरू करण्यास अनेक महिने लोटून गेले. अनेकांना शुद्ध पाण्यापासून वंचीत राहावे लागले होते. त्यावेळी गाववतीलच रहिवासी जयंत उदकवार यांनी वरिष्ठांना केलेल्या तक्रारीच्या पाठपुरवठ्या वरून धूळ खात असलेला आरो प्लांट सुरू झाला. परंतु नवीन आरोप्लान्ट कडे ग्रामपंचायत प्रशासनानी गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांसाठी आरो प्लांट लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी संतप्त ग्रामवासीयांकडून होत आहे.

हे देखील वाचा;

मारेगाव तालुक्याला दिलासा, आज केवळ 1 रुग्ण

 

Leave A Reply

Your email address will not be published.