नातेवाईकाकडे जाते म्हणून निघालेली मुलगी बेपत्ता

फूस लावून पळवून नेल्याचा संशय, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कुणी नसताना शेजा-यांना नातेवाईकाकडे जातो म्हणून घरून निघालेली मुलगी नातेवाईकांच्या घरी पोहोचलीच नाही. मुलीचा शोध लागत नसल्याने अखेर मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी (16) ही तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती तिच्या आई वडिलांसह राहते. ती यावर्षी 11 वी पास झाली होती. मात्र तिने पुढल्या वर्गात ऍडमिशन न घेतल्याने ती घरीच राहायची. शनिवारी दिनांक 20 जुलै रोजी सकाळी मुलीची आई मजुरीला गेली होती. दुपारी तिचे वडिलही कामाला गेले. पीडितेची लहान बहिण बाहेरगावी गेली होती. दरम्यान पीडिता ही घरी एकटीच होती.

संध्याकाळी पीडितेची लहान बहिण घरी आली असता तिला तिची मोठी बहिण घरी आढळली नाही. तिने किरायेदाराला विचारले असता ती दुपारीच नातेवाईकाकडे जाते, असे सांगून घरून निघाल्याची माहिती मिळाली. लहान बहिणीने ही बाब तिच्या आईला सांगितली. आईने नातेवाईकांकडे विचारणा केली. मात्र ती घरीच आली नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांनी मुलीच्या मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडे विचारणा केली. पण तिचा पत्ता लागला नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीच्या आईला आला. त्यामुळे तिने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.