बहुगुणी डेस्क, वणी: घरून तयार होऊन शाळेला गेलेली एक 14 वर्षीय विद्यार्थीनी घरी परतलीच नाही. वणी शहरात दिनांक 7 एप्रिल रोजी ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी ही 14 वर्षांची असून ती तिच्या कुटुंबीयांसह वणीत राहते. वणीतील एका शाळेत ती शिक्षण घेते.
सोमवारी दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता मुलगी शाळेला जाते म्हणून घरून निघाली. शाळा संपल्यानंतर दुपारी 3 पर्यंत मुलगी घरी परतते. मात्र ठरलेल्या वेळी मुलगी घरी परतली नाही. आज उशीर झाला असेल अशी समज करून तिची आई घरी आणखी काही काळ वाट पाहत होती. मात्र 4 वाजले, पाच वाजते तरी मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांनी परिसरात शोध घेतला. शाळेत विचारणा केली. तसेच नातेवाईकांना फोन करून मुलगी घरी आली का अशी विचारत माहिती काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीचा पत्ता लागला नाही.
मुलीच्या पालकांना मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. अखेर मुलीचे नातेवाईक व पालकांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.