मोबाईल, कपडे आणि पैसे घेऊन मुलगी बेपत्ता

फूस लावून पळवून नेल्याचा संशय, आजीची पोलीस ठाण्यात तक्रार

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कुणी नसताना संधी साधून एक अल्पवयीन मुलगी घरून निघून गेली. जाताना ती घरून मोबाईल, काही पैसे व कपडे घेऊन गेली. नातीचा आजीने शोध घेतला. मात्र तिची कोणतीही माहिती मिळत नसल्याने आजीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित मुलगी (16) ही वणीतील रहिवासी आहे. ती तिच्या आजीसह राहते. ती 12 व्या वर्गात एका कॉलेजमध्ये शिकते. बुधवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत शाळेत गेली होती. मात्र दुपारी पीडित मुलगी घरी परत आली. त्यानंतर तिची आजी ही कामानिमित्त बाहेर गेली होती.

संध्याकाळी आजी घरी आली असता. तिची लहान नात घरी होती. तिने तिची मोठी बहिण घरी नसून तिची स्कूलबॅक, कपडे आणि मोबाईल घरी दिसत नसल्याची माहिती आजीला दिली. आजीने रात्री नातेवाईकांकडे व तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली. मात्र ती घरीच आली नसल्याचे संबंधितांनी सांगितले. आजीने घरी तपासणी केली असता घरी डब्ब्यात ठेवलेले 500 रुपये देखील नव्हते. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नातीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीच्या आजीला आला. त्यामुळे त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.