धक्कादायक: अल्पवयीन मुलीची गळफास लावून आत्महत्या

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात, गावात हळहळ

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार झरी तालुक्यातील पठारपूर येथे गुरुवार 13 जाने. रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान उघडकीस आला. कु. श्रद्धा धनराज पेचे (17) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. घटनेबाबत फिर्यादी जगदीश रामकृष्ण नांदेकर, रा.पठारपूर यांनी मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Podar School 2025

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी दुपारी 2.30 वाजता दरम्यान गावातीलच धनराज पेचे याची मुलगी कु. श्रद्धा (17) हिने आपल्या राहत्या घरात सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. त्यावेळी धनराज पेचे हे बाजाराकरिता कायर येथे जाऊन होते. मुलीने गळफास घेतल्याची माहिती मिळताच ते तात्काळ पठारपूर पोहचले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना श्रद्धा हिने आत्महत्या का केली ? या बाबत कळू शकले नाही.

Comments are closed.