तीन मुलांची आई घरून बेपत्ता

वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

विवेक तोटेवार, वणी: तीन मुलांची आई अचानक घरून निघून गेली. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. महिला ही 33 वर्षांची असून ती गृहिणी आहे. तर महिलेचा पती हा मजुरीचे काम करतो. त्यांना 2 मुलं व एक मुलगी आहे. सकाळी पती नेहमीप्रमाणे मजुरीला गेला. तर मुलं घरा शेजारी खेळत होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून पत्नी घरून निघून गेली. संध्याकाळी पती घरी आल्यावर त्याला घरी पत्नी दिसली नाही. मुलांना विचारणा केली असता त्यांनी आई घरी नसल्याची माहिती दिली. त्याने शेजारी व नातेवाईकांकडे विचारणा केली. मात्र तिचा पत्ता लागला नाही. अखेर पतीने वणी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. वणी पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करून घेतली. सदर घटनेचा तपास पोकॉ सचिन मडकाम करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.