वणीतील इसम यवतमाळच्या मीना बाजारातून रहस्यमयरीत्या बेपत्ता

आढळल्यास 07232-242500 या नंबरवर संपर्क साधण्याची विनंती

विवेक तोटेवार, वणी: भल्या मोठ्या गर्दीत कोणी हरवलं, तर जास्तीत जास्त दिवसभरात ती व्यक्ती सापडते. मात्र यवतमाळच्या आझाद मैदानात लागलेल्या मीना बाजारातून मंगळवार दिनांक 6 मे रोजी बेपत्ता झालेली वणीच्या सुतारपुऱ्यातील व्यक्ती अजूनही सापडली नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी नातेवाईकानं यवतमाळ पोलीस स्टेशनला अर्ज दिला.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी माला झिलपे आणि मुकेश वामनराव झिलपे (55) यवतमाळच्या मीना बाजारात काम करत होते. दिनांक सहा मे च्या सकाळी साडेआठच्या दरम्यान ते शौचास जातो असं सांगून निघून गेले. बराच वेळ झाला तरीही ते परतले नाही. म्हणून सर्वत्र विचारपूस व शोधाशोध केली. त्यांच्या मित्रांकडे, गावात व नातेवाईकांकडेही चौकशी केली. मुकेश यांना फीट येण्याचा आजार आहे. त्यामुळे सर्व कुटुंबीय काळजीत आहे. अखेर नात्यातल्या माला योगेश झिलपे यांनी यवतमाळ पोलीस स्टेशनला मुकेश झिलपे हरवल्याची तक्रार दिली.

मुकेश झिलपे यांची उंची 5 फूट 4 इंच आहे. रंग सावळा असून चेहरा लांबट आहे. डोळे मोठे व नाक सरळ आहे. बांधा मध्यम असून उजव्या हाताचे मधले बोट वरील बाजूस वाकडे झालेले आहे. निघताना या व्यक्तीने फिकट गुलाबी रंगाचा लांब बाह्यांचा टी-शर्ट आणि काही नाईट पॅण्ट घातली होती. या व्यक्तीला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. तसेच खर्रा व तंबाखू खाण्याची सवयदेखील आहे.अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव 9823393910 आणि पो.हे.कॉन्स्टेबल एस. एच. मासुळकर 8605215434 किंवा यवतमाळ पोलीस स्टेशनच्या 07232-242500, 07232-256708 अथवा 8390382517 किंवा 9622761466 यापैकी कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधण्याची विनंती केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.