तरुणाने नदीकाठावरच झाडाला घेतला गळफास

वणीतील तरुण गेल्या 5 दिवसांपासून होता बेपत्ता

विवेक तोटेवार, वणी: गेल्या शुक्रवारपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा सोमवारी दिनांक 23 डिसेंबर रोजी मृतदेह आढळला. अर्जून हरिभाऊ काळे (28) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वणीतील तेलीफैल येथील रहिवासी होता. तालुक्यातील रांगणा येथील नदी काठावरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. अर्जूनचे आईवडील काही वर्षांपूर्वीच मरण पावले. तर एक भाऊ दोन वर्षांपूर्वीच मरण पावला. बहिणीचे लग्न झाल्यानंतर दोघे भाऊ सोबत राहत होते. अर्जुन हा मिस्त्री काम करून आपला उदरनिर्वाह करायचा. 18 डिसेंबर रोजी तो घरून निघून गेला. तो बुधवारी रात्री घरी परत न आल्याने दुस-या दिवशी याबाबतची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी शोध घेतला असता अर्जुन कुठेही आढळून आला नाही. अखेर 23 डिसेंबर रोजी तालुक्यातील रांगणा येथील वर्धा नदीच्या काठावरील पिंपळाच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अर्जूनने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Comments are closed.