अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर, इजहार शेखवरील खोटे गुन्हे मागे घ्या

जितेंद्र कोठारी, वणी : कॉंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांच्यावर वणी पोलिस ठाण्यात दाखल खोटे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून करण्यात आली आहे. शहरातील दीपक चौपाटी येथे दिनांक 9  अॅगस्ट  रोजी निखिल ढुरके यांना मारहाण केल्या प्रकरणी इजहार शेख व इतर 5 जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अट्रॉसिटी) सह विविध कलमा लावण्यात आली आहे. परंतु सदर प्रकरणात पोलिसानी दबावाखाली  इजहार शेख यांच्यावर गैर कायदेशीररित्या अट्रॉसिटी लावल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेखवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व  उप विभागीय पोलीस अधिकारी वणी यांना देण्यात आले.

वणी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष करुणा कांबळे व सामाजिक कार्यकर्ता रवींद्र कांबळे यांनी पोलीस अधीक्षक यवतमाळ व उप विभागीय पोलीस अधिकारी वणी यांना निवेदन दिले. निवेदनात कांबळे दाम्पत्यानी मारहाणीच्या घटनेच्या वेळी इजहार शेख घटनास्थळी उपस्थित नसताना त्यांच्यावर गैर कायदेशीररित्या अट्रॉसिटीची कलम लावण्यात आली असल्याचे नमूद केले आहे. शहरातील एन.एच. फाऊंडेशन तर्फे विक्रांत चचडा व नीलेश बेलेकार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांना निवेदन देऊन इजहार शेखवर सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला असून खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली.

वणी विधानसभा युवक कॉंग्रेसतर्फे झरीजामणी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून इजहार शेख हे कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी असून त्यांच्या नाव बदनाम करणाऱ्या षड्यंत्रकारी लोकांची चौकशी तसेच इजहार शेखवरील लावलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.