निकेश जिलठे, वणी: आज सोमवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी भाजपचे उमेदवार व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तत्पुर्वी सकाळी 11 वाजता शासकीय मैदान येथे त्यांच्यातर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. निवडणूक अर्ज भरण्यासाठी मतदारसंघातील समर्थकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे.
आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांना भाजपच्या पहिल्याच यादीत नाव येण्याचा मान मिळाला. उमेदवारी जाहीर होताच ते कामाला लागले. त्यांचा ग्रामीण भागातील नेत्यांची बैठक घेण्याचा सपाटा सुरु आहे. कार्यकर्ते, बुथ प्रमुख देखील कामाला लागले आहेत. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पूर्ण भीस्त ही विकासकामांवर राहणार आहे. मतदारसंघात केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्ते सध्या करीत आहे.
विजयाची हॅटट्रीक करणार !
मतदारसंघातील विकासकामे थांबली होती. गेल्या 10 वर्षांपासून ज्या गावात विकासाची गंगा पोहोचली नव्हती. त्या गावात देखील भाजपने रस्ते, शुद्ध पाणी, शिक्षण, रोजगार असा सर्वांगीन विकासकामे केली आहे. याची पोचपावती मतदारांनी गेल्या निवडणुकीच्या वेळी दिली. 2014 पेक्षा 5 पट पेक्षा अधिक मतांनी नागरिकांनी निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जनहिताच्या योजनांमुळे सर्वसामान्य नागरिक आनंदी आहेत. त्यामुळे गेल्या वेळी पेक्षा अधिक मतांनी विजय होईल व विजयाची हॅटट्रीक साधणार, असा विश्वास त्यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना व्यक्त केला.
Comments are closed.