विकासकामांवर आहे आमदार बोदकुरवार यांची भिस्त

10 वर्षांत कोट्यवधींचे विकासकामे, अनेक रखडलेले प्रकल्प पूर्ण

निकेश जिलठे, वणी: गेल्या 35 वर्षात वणी विधानसभेची आमदारकी 4 टर्म काँग्रेसकडे होती. तर एकदा शिवसेनेकडे होती. मात्र या 35 वर्षांत जेवढे विकास कामे झाले नाहीत ते कामे गेल्या 10 वर्षात झाले. अनेक रखडलेले प्रकल्प, रस्ते, पूल, पाणी पुरवठा इत्यादी योजना गेल्या 10 वर्षांत राबवल्या गेल्या. केवळ रस्तेच नाही तर सर्वांगीण विकास मतदारसंघात झाला. त्यामुळे या निवडणुकीची संपूर्ण भिस्त विकासकामांवरच राहणार, अशी प्रतिक्रिया आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी बहुगुणीला दिली.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या काळात झालेले सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे रस्ते बांधणी. यात शहरांचा तसेच ग्रामीण भागीतील रस्त्यांचा समावेश आहे. वणी शहरात आज अधिकाधिक भागात सिमेंट रस्ते आहे. त्याचे काम गेल्या 10 वर्षात झाले. ग्रामीण भागातील अनेक गावातील रस्त्यासाठी नागरिकांनी उंबरठे झिजवले. मात्र ग्रामीण भागातही रस्त्याचे जाळे हे गेल्या 10 वर्षात झाले.

ग्रामीण भागात पांदण रस्त्याची मोठी समस्या आहे. पावसाळ्यात याचा मोठा त्रास शेतक-यांना सहन करावा लागतो. मात्र आज अधिकाधिक ग्रामीण भागात पांदण रस्ते तयार झाले आहेत. तर अनेक गावातील रस्त्यांची कामे मंजूर झाले आहे. रस्त्याच्या कामामुळेच ग्रामीण भागात आमदार बोदकुरवार यांची लोकप्रियता वाढलेली आहे.

वणी शहराची एन्ट्री होणार उड्डानपुलाने
वणी शहराच्या तीन प्रमुख एन्टी पैकी यवतमाळ रोड व वरोरा रोड येथे रेल्वे क्रॉसिंग आहे. रेल्वेक्रॉसिंगमुळे प्रवाशांना बराच काळ या ठिकाणी तातकळत उभे राहावे लागते. वरोरा रोडवरील एन्ट्रीवर तर रेल्वे सायडिंग असल्याने अर्धा अर्धा तास प्रवाशांना थांबून राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन आ. बोदकुरवार यांनी उड्डाणपुलाबाबत पाठपुरावा केला. या दोन्ही उड्डाणपुलासाठी प्रत्येकी 100 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. याचे काम देखील युद्धपातळीवर सुरु आहे. यासह अडेगाव खातेरा येथील नदीवर 25 कोटींचा पूल बांधण्यात आला.

पाणीपुरवठा योजना
लोकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 140 कोटींचा निधी खेचून आणला. यासह गेल्या पंचवार्षीक मध्ये बोदकरवार यांनी ठिकठिकाणी शुद्ध पाणी मिळण्यासाठी वॉटर एटीएम सुरु केले. त्यामुळे नागरिकांना आता गारेगार पाणी मिळत आहे. शुद्ध पाण्यामुळे रोगराईची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे.

अलिकडचे काही महत्त्वपूर्ण कामे
अलिकड़च्या काळातील आमदार बोदकुरवार यांचे प्रमुख कार्य म्हणजे क्रीडा संकुल. सदर क्रीडा संकुल हे वातानुकुलीत राहणार आहे. यासाठी 20 कोटींचा निधी आ. बोदकुरवार यांनी खेचून आणला आहे. तर न्यायालयाच्या इमारतीच्या कामासाठी 65 कोटींचा निधी त्यांनी शेवटच्या क्षणी ओढून आणला. नाट्यसंकुल हे तयार झाले असून त्याला राम शेवाळकरांचे  नाव देखील देण्यात आले आहे. वणीतील कलावंताना यानंतर वातानुकुलीत नाट्यगृहात आपली कला सादर करता येणार आहे.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची या निवडणुकीत प्रचाराची संपूर्ण भिस्त ही विकासकामांवर आहे. ते वेळोवेळी विकास कामांवरच सध्या प्रचार करीत आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या विकासकामांना मतदार कसा प्रतिसाद देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.