विविध आदिवासी संघटनांचा आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पाठिंबा

मारेगाव, झरी तालुक्यात आ. बोदकुरवार यांचा धुवाधार प्रचार

बहुगुणी डेस्क, वणी: आज अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मारेगावचे तालुकाध्यक्ष अनिल गेडाम नगरसेवक व बिरसा बिग्रेडचे तालुकाध्यक्ष शेषराव मडावी यांनी भाजप महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यासह आदिवासी जनसंग्राम संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्रीधरभाऊ सिडाम यांनी तात्काळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करून भाजप पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पाठींबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळे आ. बोदकुरवार यांना आणखी बळकटी मिळाली आहे.

मारेगाव तालुक्यात बोदकुरवार यांचा धुवाधार प्रचार
वणी विधानसभा मतदारसंघातील मारेगांव तालुक्यात मांगरुड, कोलगाव, वेगाव, केगाव, गोधनी, मारेगाव शहर, करणवाडी, बुरांडा, हटवांजरी, भूरकीपोड येथे आ. बोदकुरवार यांचा प्रचार दौरा झाला. यावेळी काढण्यात आलेल्या पदयात्रेत कार्यकर्त्यांनी गावक-यांना भाजपचे ध्येय धोरणे समजावून सांगितले तसेच वणी विधानसभेचा वचननामा याची माहिती दिली. या दौऱ्यानिमित्त विविध मंदिर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, क्रांतिवीर बिरसामुंडा, क्रांतिवीर शामादादा कोलाम तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विकासकामांमुळेच होणार विजय – आ. बोदकुरवार
माझ्या कार्यकाळात झालेल्या विकासकामामुळे जनतेचे प्रेम भरभरून मिळत आहे. मात्र काही कामे अद्यापही बाकी आहेत. उर्वरीत कामे पुढील पाच वर्षात करण्यात येईल. मतदारसंघाचा विकास असाच सुरु राहण्यासाठी व विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी यावेळी आपले अमुल्य मत द्या असे आवाहन त्यांनी केले. यासह त्यांनी स्थानिक विकास, रोजगारनिर्मिती, भाजपा- महायुती सरकारने जनसामन्याच्या फायद्यासाठी केलेली अनेक लोकउपयोगी विकासकामे, राबविलेल्या जनकल्याकारी योजनेची माहिती दिली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मारेगाव अविनाश लांबट,भाजपा जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा शंकर लालसरे, शिवसेना शिंदे गट तालुकाध्यक्ष विशाल कीन्हेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दयाल रोगे, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, रमन डोये , शालीनीताई दारूंडे, गणपत वराटे, गणेश झाडे,पवन ढवस, लीलाधर काळे, अनूप महाकूलकर, वैभव पवार ,राहूल राठोड, डोमाजी भादीकर, सुशीला भादीकर, दादाराव ढोबरे व महायुती चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झरी येथे प्रचार दौरा
वणी विधानसभा मतदरसंघातील झरी तालुक्यातील कोसारा, सिंधिवाढोना, दरा, बाळापुर, बोपापूर, चिंचघाट, अडकोली, पांढरकवडा(लहान), झरी, शिबला, हिवराबरसा, माथार्जुन येथे आमदार बोदकुरवार यांचा प्रचार दौरा झाला. यावेळी आदिवासी बांधवांना सोबत भेटी, झरी येथील रॅलीत मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष झरी सतीश नाकले, ख.वि.अध्यक्ष मुन्ना बोलेरवार, शिवसेना शिंदे गट मोरेश्वर सरोदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मानकर, माजी पं.स.सभापती राजेश्वर गोंड्रावर, भाजपा जेष्ठ नेते अशोक बोदकुरवार, बच्चू चिडे, नाना सुगंधे, लताताई आत्राम, संजय दातारकर, अनिल पोटे, अनिल विधाते व महायुती पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.