सुशील ओझा, झरी: आमदार संजीवरेड़्डी बोदकुरवार यांनी झरी तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी तालुका दक्षता समिती व इतर प्रशासकीय समितीसोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. चीनमधला कोरोना आता खेड्यापाड्यातही पोहोचत आहे. कधी कुठे कोरोना पोहोचेल याची काहीही शास्वती नाही त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सध्या झरी तालुक्यात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आमदार संजीवरेड़्डी बोदकुरावार यांनी प्रशासकीय अधिका-यांसोबत आढावा बैठक घेतली.
दक्षता समितीसोबत झालेल्या बैठकीत तहसिलदार जीएम जोशी, पं. स. सभापती राजूभाऊ गोंड्रावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन गेडाम, विष्णू निकोडे, पीआय डीएस सोनुले, एपीआय एपी बारापात्रे आदी अधिकारी उपस्थित होते.