आमदारांनी दिले परिवहन मंत्र्यांना मारेगाव बसस्थानकासाठी निवेदन

खुद्द सत्ताधारी पत्राच्या आमदारालाच द्यावे लागत आहे निवेदन

0

मारेगाव: वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोतकुलवार यांनी मुंबई येथे अधिवेशना दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते यांना मारेगाव बसस्थानकासंबंधी निवेदन दिले. मारेगाव बसस्थानकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. मारेगाव तालुक्याचं ठिकाण असल्यानं या ठिकाणी तालुक्यातील प्रवाशांची नेहमी ये जा असते. पण बसस्थानक नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्या आमदारांनी निवेदनाद्वारे बसस्थानकाची मागणी केली आहे.

गेल्या वर्षी बसस्थानकासाठी खुद्द आमदारांनी एका जागेचे भूमीपुजन केले असल्याची चर्चा होती. पूर्वी अनेक पक्षांनी, संघटनानी शासनस्तरावर निवेदने, आंदोलन केली, मात्र बसस्थानकाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस रमण डोये यांनी बसस्थानकाची समस्या आमदाराच्या कानी घातल्यावर आमदार बोतकुलवार यांनी मारेगावात बसस्थानक व्हावे म्हणून आपन विधान भवनात प्रश्न मांडू असे वचन दिले होते.

(सरपंचाच्या पुढाकाराने साकारत आहे ग्राम पंचायतीची इमारत)

अखेर आमदारांनी याप्रश्नी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन मारेगाव बसस्थानकाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली. निवेदन देण्यासाठी विधान भवन परिसरात आमदार बोतकुलवार, रमण डोये, वणी पं.स.चे उपसभापती विजय गारघाटे, कार्यकर्ते रोहिदास दगडे हे उपस्थित होते. मतदारसंघातील बसस्थानकाचा प्रश्न सोडवण्यासाठी खुद्द सत्ताधारी आमदारालाच निवेदन द्यावे लागत असल्याने आमदार विधानसभा क्षेत्राच्या विकासकामात कमी तर पडत नाही ना, असा उपस्थित होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.