अश्लिल व्हिडीओ क्लिप प्रकरण : आरोपीस 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

आता केसचा तपास करणार महिला पोलीस

0

विवेक तोटेवार, वणी: अश्लिल व्हिडीओ क्लिप काढून बलात्कार केल्या प्रकरणी वणीतील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता भास्कर गोरे याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी भास्कर गोरेला 18 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर पीडित महिलेस यवतमाळ येथील सरकारी रुग्णालयात तपासणी करीत पाठविण्यात आले आहे. आरोपी महिलेला प्रगती नगर येथील एका घरी नेऊन महिलेवर अत्याचार करायचा अशी माहिती समोर आली होती. मात्र केवळ प्रगती नगर येथील घरातच नाही तर छोरीया ले आउटमधल्या एका घरात नेऊनही तो अत्याचार करायचा अशी माहिती समोर येत आहे. या संपूर्ण घटनेचा तपास पो उ नी मुरलीधर घडामोडी करीत होते. मात्र आता या केसची संपूर्ण जबाबदारी ही पो उ नी संगीता हिलोंडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

पीडित महिलेनं तक्रार केली होती की अंगणवाडीत नोकरीला लावून देतो असं सांगत आरोपीनं आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर अश्लिल क्लिप काढून ब्लॅकमेल करत वेळोवेळी विविध ठिकाणी बलात्कार केला. मात्र या प्रकरणामुळे सर्वांना एक प्रश्न पडला होता की महिलेने नेमके आताच हे प्रकरण समोर का आणले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

‘गोरे’चं काळं कृत्य कसं आलं समोर ?
आरोपी अश्लिल क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर वेळोवेळी अत्याचार करायचा. अनेकदा त्याने पतीला आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. सोबतच त्याने वेळोवेळी ब्लॅकमेल करत पैसे उकळल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे. आरोपी केवळ महिलेलाच ब्लॅकमेल करून थांबला नाही तर पुढे त्याने महिलेच्या पतीला क्लिप दाखवून समाजात बदनामी करणार अशी धमकी दिली. त्याला वाटले की अश्लिल क्लिप बाहेर आली तर समाजात बदनामी होईल. त्यामुळे पती पैसे देण्यास तयार होईल. जेव्हा पतीने पीडितेस याबाबत विचारणा केली तेव्हा पत्नीने हा सर्व प्रकार पतीसमोर कथन केला.

झालेल्या प्रकाराबाबत पतीनं पत्नीची साथ द्यायचं ठरवलं आणि पोलिसात आरोपीबाबत तक्रार करण्याचं निश्चित केलं. त्यानंतर त्यांनी पोलिसात संपर्क साधला. आरोपी राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याने तसंच प्रकरण नाजूक असल्याने पोलिसांनी अतिशय सावधगिरीने हे प्रकरण समजून घेतलं व अखेर सोमवारी रात्री आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत. तसंच आरोपीने आणखी कुठल्या महिलेला ब्लॅकमेल तर नाही केलं याचा तपास पोलीस करीत आहे.

(हे पण वाचा- महिलेची अश्लिल व्हिडीओ क्लिप काढून शारीरिक शोषण)

Leave A Reply

Your email address will not be published.