अश्लिल क्लिप प्रकरण: आणखी एक राजकीय पदाधिकारी अडकण्याची शक्यता

'तो' दुसरा व्यक्ती कोण ?

0

रवि ढुमणे, वणी: सध्या वणी शहरात एका महिलेचे लैंगिक शोषण करून तिचा व्हिडीओ तयार केल्याच्या प्रकरणानं चांगलीच खळबळ उडवली आहे. या प्रकरणात राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी भास्कर गोरे याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात सदर व्हिडीओ तयार करणारा व्यक्ती अडकण्याची शक्यता बळावली आहे. हा व्हिडीओ तयार करणारी व्यक्ती सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे. सध्या वणी पोलिसांनी एकच आरोपीला गजाआड केले आहे. आरोपी भास्कर गोरेला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. परंतु दुसरा कोण आहे हे अद्याप गुलदस्त्यात असल्याने या प्रकरणाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

वणीतील काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असलेल्या भास्कर गोरे नामक कंत्राटदार तरुणाने शहरातील ३३ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा अश्लील व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओद्वारे तो बॅकमेल करत महिलेचं शारीरिक शोषण करत होता. तसंच तिच्याडून आरोपीनं रक्कम वसूल केल्याची तक्रार वणी पोलिसात दिली आहे. यावरून भास्कर गोरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र यात पीडितेचे समाधान झाले नव्हते. यातील व्हिडीओ काढणारा दुसरा कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता. गेल्या ४ दिवसापासून भास्कर पोलीस कोठडीत आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे करीत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात सत्ताधारी पक्षाचा एक पदाधिकारी अडकण्याची शक्यता बळावली आहे.

पीडित महिलेला अंगणवाडी सेविका पदावर लावून देण्यासाठी रक्कम घेण्यात आली होती. त्यामुळे संबंधितांचे तिच्या घरी जाणे येणे वाढले होते. यात त्यांची जवळीक सुद्धा आली होती. परंतु हाच धागा पकडून पीडितेच्या खासगी भागाचे चित्रीकरण करीत तिला वारंवार शरीरसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप सदर पीडितेने तक्रारीतून केला होता.

जेव्हा भास्कर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यावेळी तिची फिर्याद वाचून तिला न्याय मिळणे अपेक्षित होते. आता या घटनेचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे आला त्यामुळे तपासाला गती मिळाली असल्याचंही बोलले जात आहे. एकूणच या प्रकरणात सहभागी असलेला राजकीय पदाधिकारी असलेला ‘सेवक’ अडकण्याची शक्यता आणखीच बळावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.