अन् जाणता राजा थांबलेच नाही…

ते वाट पाहत राहिले अन् ताफा सुसाट निघून गेला

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: माजी कृषीमंत्री शरद पवार सध्या विदर्भ दौ-यावर आहेत. दि.१६ नोव्हेंबर गुरुवारला ते यवतमाळ जिल्ह्याला भेट देणार असल्यानं ते गडचिरोली वरुन मारेगाव मार्गे यवतमाळला गेले. त्या वेळेस शेतकरी त्यांची वाट पाहत बसले होते. शेतक-यांना त्यांच्या व्यथा माजी कृषीमंत्रीजवळ व्यक्त करायच्या होत्या. मात्र त्यांचा ताफा थांबलाच नाही. त्यामुळे शेतक-यांची चांगलीच निराशा झाली.

शरद पवार मारेगाव मार्गे यवतमाळ जाणार असल्याची माहिती तालुक्यातील चनोडा गावच्या रविन्द्र काकडे नामक शेतकऱ्याला मिळाली. सदर शेतकरी दुपारी बारा वाजे पासून पुष्पहार घालून साहेबांचं स्वागत करू. त्यांना आपल्या व्यथा सांगू या उद्दशाने त्यांची वाट पाहत बसला होता. सायंकाळी सहा वाजता मारेगावात त्यांच्या ताफ्याचं आगमन झालं. रविन्द्र काकडे बारा वाजता खरेदी केलेला पुष्पहार हातात घेऊन शरद पवारांच्या गाडी समोर येण्याच्या प्रयत्नात होता.झेड+ सुरक्षा असलेल्या ताफ्यातल्या जवळ जाणार तोच शरद पवारांचा ताफा सुसाट वेगाने यवतमाळचे दिशेने रवाना झाला.

सहा तासांपासून साहेबांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकर्यांचाअपेक्षाभंग झाला आहे. सदर शेतकरी मारेगाव तालुक्यात शेतकऱ्यांवर सध्या विषबाधा व गुलाबी बोंड अळीच्या प्रकोपाने त्रस्त झाला आहे. शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आपण शरद पवार साहेबांशी दोन शब्द बोलून व्यथा मांडणार असल्याच सदर शेतकर्याचे म्हणणे होते, परंतु साहेबाचा ताफा सुसाट गेल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला. अखेर त्यांनी मनापासून घेतलेला पुष्पहार त्यांच्या सोबत असलेला शेतकरी यांच्या गळ्यात टाकला.

तब्बल सहा तास आतुरतेने वाट पाहुन जर एक मिनिटासाठी लोकनेता थांबत नसेल तर शेतकर्यांनी कोणाकडे दाद मागावी या विवंचनेत स्वागत करण्यासाठी सकाळ पासून वाट पाहणारा शेतकरी हिरमुसल्या तोंडाने आपल्या गावी परतला.

Leave A Reply

Your email address will not be published.