जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील गरीब व अल्प भू धारक शेतकऱ्यांच्या विवाहयोग्य मुलीच्या लग्नासाठी मनसे नेता राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे कन्यादान योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत तालुक्यातील पहिलं विवाह सोहळा 30 एप्रिल 2023 रोजी वांजरी गावात संपन्न होत आहे.
वांजरी येथील भास्कर नाचणकर यांची जेष्ठ कन्या रेणुका हिचा विवाह वरोरा तालुक्यातील माढेळी येथील दिलीपराव बावणे यांचे चिरंजीव प्रशांत सोबत वांजरी येथील वंदनीय तुकडोजी महाराज सभागृहात मनसे नेता राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहेत. या विवाह सोहळ्यात मंडप, डेकोरेशन, जेवणासह इतर खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केले जाणार आहे. मनसेच्या या सामाजिक उपक्रमामुळे तालुक्यातील शेकडो गरीब शेतकरी, शेतमजूरांना आपल्या विवाह योग्य मुलीच्या लग्नासाठी आर्थिक बळ मिळणार आहे.
मागील वर्षी वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार व तिबार पेरणीचा संकट उभा झाला होता. त्यावेळीही मनसे नेता राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना राबवून हजारो शेतकऱ्याना मोफत बी बियाणे वाटप करण्यात आले होते. 4 नोव्हेंबर 2022 रोजी लाभयार्थ्याना बी बियाणे किट वाटप कार्यक्रमात मनसे नेता राजू उंबरकर यांनी सौ. शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी कन्यादान योजना सुरु करण्याची घोषणा केली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वणी विधानसभा क्षेत्रात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येते. येत्या काही दिवसात आणखी काही मुलीच्या लग्नाची जबाबदारी मनसे पार पाडणार आहे. समाजातील दीन दुर्बल घटकांसाठी सतत झटणारे राजू उंबरकर यांच्या कार्याची दखल घेऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच त्यांना पक्षनेता पदाची जबाबदारी सोपवली आहे.
Comments are closed.