मारेगाव तालुक्यात मनसेचा माहौल, सभेला हजारोंची गर्दी

गणेशपूर येथील ग्रामपंचायत सदस्य व इतरांचा पक्ष प्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहेत तसतशी निवडणुकीची चर्चा सुद्धा जोर धरत आहे. हळूहळू वाढणाऱ्या थंडीत दिवसा मात्र राजकीय चर्चेने वातावरण गरम होत आहे. राजकीय पक्ष विचारणारा जातीनिहाय गणिते कार्यकर्त्यांची ये जा सोबतच वणी विधानसभा मध्ये आपल्या आर्थिक संपन्नतेच्या जोरावर ठाकलेल्या उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे कामाचा माणूस नावाने चर्चेत असलेल्या राजू उंबरकर यांनी मात्र विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगला जोर धरला आहे.

मार्डी येथील सभेमध्ये मतदारांची जमलेली तोबा गर्दी विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची नांदी ठरवणारी असल्याचे मतदारांकडून बोलल्या जात आहे. गेल्या १८ ते २० वर्षात उंबरकर यांनी सामाजिक सह राजकीय कार्यक्रमांमध्ये आघाडीवर राहून मतदारांशी नाळ जोडून ठेवलेली आहे. याचाच फायदा या निवडणुकीत मनसेला होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. आजवरच्या निवडणुकांत मारेगाव तालुक्यात राजू उंबरकर नेहमी आघाडीवर राहिलेले आहे. त्यामुळे मारेगाव तालुका हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो.

उंबरकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेतून त्यांनी मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन मांडून या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजयी करण्याचा आव्हान मतदारांना केले. मारेगाव तालुक्यामध्ये उंबरकर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून यावेळी मारेगाव तालुक्यात राजू उंबरकर आघाडीवर असतील हे निश्चित. मार्डी येथे पार पडलेल्या प्रचार सभेस तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, शुभम भोयर, उदय खिरटकर,वामन चटकी, अनंता जुमडे, रोशन शिंदे, गुड्डू वैद्य, प्रशांत तोरे, धीरज हरबडे यांच्या सह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गणेशपूर येथील ग्रामपंचायत सदस्य व इतरांचा पक्ष प्रवेश
वणी शहरा नजिक असलेल्या गणेशपूर येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व अन्य नागरिकांनी शहराध्यक्ष शिवराज पेचे यांच्या नेतृत्त्वात राजू उंबरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यात गणेशपूर येथील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण आत्राम, आशिष बोबडे, माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काकडे, सुधीर खापणे, उषा कोडापे, अक्षय बोबडे यांच्या सह अन्य आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व अन्यचा समावेश आहे. यावेळी मनसेचे विधानसभा उमेदवार राजू उंबरकर यांनी त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराध्यक्ष शिवराज पेचे, स्वप्निल लांडगे, जयश बुच्चे, नितीन ताजने आदी उपस्थित होते.

Comments are closed.