मनसेचे आज वणीत जोरदार शक्तिप्रदर्शन, शहरात रॅलीचे आयोजन

दु. 2 वाजता शासकीय मैदानातून निघणार रॅली

बहुगुणी डेस्क, वणी: विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला. आजवर मविआ, महायुती, मनसे आणि अन्य उमेदवाराकडून जोरदार प्रचार करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी आज शहरांमध्ये शक्ती प्रदर्शनाचे आयोजन करत. आपल्या समर्थकांसह रॅली काढून मतदारांच्या भेटी घेणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. दुपारी ०२.०० वाजता शासकीय मैदानावरून ही रॅली मुख्य बाजारपेठ खाती चौक, गांधी चौक, दीपक चौपाटी, टागोर चौक, आंबेडकर चौक अशी असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीची सांगता होणारं आहे. आजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचारात पहिलेपासून आघाडी कायम ठेवली असून अंतिम टप्प्यात सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोरदार शक्ती प्रदर्शन करून मतदारांना आवाहन करणार आह.

Comments are closed.