वणीत मनसेचे जोरदार शक्तीप्रदर्शन, हजारोंचा समर्थकांचा सहभाग

रॅलीने वेधले वणीकरांचे लक्ष, ठिकठिकाणी उंबरकर यांचे स्वागत

बहुगुणी डेस्क, वणी: प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मनसेचा जोरदार शक्तिप्रदर्शन मनसे उमेदवार राजू उंबरकर यांच्या समर्थनार्थ शहरात हजारों मनसे कार्यकर्त्यांनी काढली रॅली. मनसे उमेदवार राजू उंबरकराच्या नेतृत्वात शहरातील शासकीय मैदानातून हजारोच्या संख्येने मनसैनिकांनी बाजारपेठ सह मुख्य मार्गातून भव्य रॅली काढून वणी मतदार संघात मनसेची वाढलेली ताकद समोर आणली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्याची आतिषबाजीसह रॅलीचे समापन कार्यक्रमात मनसेचे उमेदवार राजु उंबरकर यांनी विकास कामावरून लोक प्रतिनिधींना धारेवर धरत अनेक गंभीर आरोप केले. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार हे पावसाळ्यात निघणाऱ्या काजव्या प्रमाणे पाच वर्षात एकदा नागरिकांना दर्शन देतात. असा आरोप राजू उंबरकर यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

उंबरकर म्हणाले की, वणी विधानसभेतील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहे. एका सदस्याला जर ठेच लागली तर ती ठेच मला लागल्याचे जाणवते. जातीपातीचा राजकारण न करता वणीला विकसित करण्याचा माझा स्वप्न आहे. त्यासाठी मला तुमचं साथ पाहिजे. असा आवाहन राजू उंबरकर यांनी केला. एकंदरीत मनसेचे शक्तीप्रदर्शन पाहता. या विधानसभा क्षेत्रात मनसे इतिहास घडवणार असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Comments are closed.