विवेक तोटेवार, वणी: वणीतील एका महाविद्यालयात बी ए प्रथम वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरुवारी पीडितेने तिच्या वडिलांसोबत पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
गुरुवारी 4 ऑक्टोबर रोजी पीडिता ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेली. सकाळी 10 वाजताच्या सुमारास इंग्रजीचा तास ऑफ असल्याने ती कॉम्प्युटर क्लाससाठी निघाली. वाटेतच तिच्यावर डोळा ठेऊन असलेल्या मोहन महादेव ठाकरे (27) याने तिला वाटेतच रोखून अगोदर तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. परन्तु पीडितेने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही व पुढे चालत गेली.
याच वेळी मोहनने पीडितेचा हाथ पकडून तिचा विनयभंग केला. या घटनेच्या अगोदरही मोहनने पीडितेसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता. परन्तु तिने याकडे दुर्लक्ष केले व कुणाला सांगण्याचे धाडस केले नाही. यामुळे ही घटना घडली.
पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर कलम 354 नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.