बहुगुणी डेस्क, वणी: आता वणी पाठोपाठ मारेगावातही गाडी चोरट्यांनी डोकं वर काढलं. वाढत्या उन्हामुळे शक्यतो कोणी घराबाहेर पडायला पाहत नाही. मात्र लग्न रिसेप्शन किंवा अन्य कार्यक्रमानिमित्त अनेकांना जावं लागतं. अर्धा एक तास कार्यक्रम झाला की आपण लगेच घरी निघून असाच सर्वांचा बेत असतो. तसाच बेत मारेगाव येथील मुत्युंजय गजाननराव मोरे (60) या शेतकऱ्यांना आखला होता. मात्र केवळ अर्ध्या तासातच चोरट्यांनी त्यांची मोपेड लंपास केली.
तक्रारीनुसार, फिर्यादी मुत्युंजय गजाननराव मोरे (60) हे मारेगावात वार्ड नं 3 मध्ये राहतात. त्यांच्या कडे राखाडी रंगाची होंडा एक्टिवा मोपेड(MH 29 CG 0525 किंमत अंदाजे 70 हजार) आहे. ते तिचा दैनंदिन वापरासाठी उपयोग करायचे. याच मोपेडने ते 7 मेला संध्याकाळी रिसेप्शनसाठी मारेगावातील एका मंगल कार्यालयात गेलेत. मंगल कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी त्यांची गाडी गेटच्या बाजूला लावली. अर्ध्या तासाने म्हणजे अंदाजे 9.30 वाजताच्या दरम्यान ते गेट जवळ आले. मात्र त्यांना त्यांची मोपेड तिथे दिसली नाही.
त्यांनी आजजूबाजूला शोध घेतला. चार दोन लोकांना विचारपूसही केली पण हाती काहीच आलं नाही. अखेर त्यांनी पोलीस स्टेशन गाठल त्याची तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी वर बीएनएसच्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास HC आनंद अलचेवार, पो.स्टे. मारेगाव करत आहेत.
Comments are closed.