भरधाव दुचाकी दिशादर्शक फलकावर धडकली, दोघ जखमी

वणी घुग्गुस मार्गावर बेलोरा फाट्याजवळची घटना

Jadhao Clinic

जितेंद्र कोठारी, वणी : घुग्गुसकडे जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या दिशादर्शक फलकावर मोटरसायकल आदळून दोघजण जखमी झाले. वणी घुग्गुस राज्यमार्गावर बेलोरा फाट्याजवळ ही घटना आज दुपारी 1.30 वाजता दरम्यान घडली. जखमींना उपचारासाठी वेकोलीच्या अम्बुलेन्समध्ये घुग्गुस येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. जखमी दुचाकीस्वार वणी तालुक्यातील वांजरी गावाचे असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. अपघात झाल्याची माहिती मिळताच शिरपूर पो.स्टे. मधील पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले. मात्र तोपर्यंत जखमींना घुग्गुस येथील रुग्णालयात पाठविण्यात आले असून जखमी युवकांचे नाव कळू शकले नाही.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!