युक्रेन-रशिया युद्धामुळे शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक घसरण

नवगुंतवणूकदारांना गुंतवणुकीची सुवर्ण संधी - शेअर मार्केट एक्सपर्ट...... शेअर मार्केटबाबत वणीत मोफत कन्सलटन्सी आणि मार्गदर्शन उपलब्ध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: युक्रेन आणि रशिया युद्धाचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर पडला आहे. भारतातही शेअर बाजारात या वर्षातील सर्वात मोठी घसरण बघायला मिळाली आहे. नवगुंतवणूकदार तसेच या क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणा-यांसाठी ही सुवर्ण संधी असून गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ असल्याचे मत परिसरातील शेअर मार्केट एक्सपर्ट निखिल भोयर यांनी व्यक्त केली आहे.

रशिया-युक्रेनच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्री-ओपनिंग सत्रात मोठी घसरण दिसून आली. निफ्टी जवळपास 2.70 टक्क्यांनी कोसळला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1110 अंकांनी कोसळला होता. युद्धाच्या सावटामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा सुरू केला आहे.

शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रतील स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली. बँकिंग क्षेत्रातील शेअर्स गडगडले आहेत. मिड कॅप, स्मॉल कॅपमध्येही मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 स्टॉक्समधील सर्व स्टॉक्सच्या शेअर दरात घसरण झाली आहे.

नवगुंतवणूकदारांना मोफत मार्गदर्शन – रोहित काकडे
शेअर बाजार कोसळल्याने नवगुंतवणूकदारांना गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहे. ज्या लोकांना या क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे. किंवा जी व्यक्ती या क्षेत्रात येण्यास इच्छुक आहेत. अशा व्यक्तींना मोफत मार्गदर्शन तसेच यासाठी लागणा-या सर्व तांत्रिक बाबी मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार. शिवाय ज्या व्यक्तींना शेअर मार्केटचे ज्ञान शु्न्य आहे अशा व्यक्तींनाही मोफत बेसिक कोर्स शिकवला जाईल. शहरात अनेकांनी या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेतला असून आज ते यशस्वीरित्या शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करित आहे. त्यामुळे इच्छुकांनी एकदा संपर्क साधावा.
– रोहित काकडे, शेअर मार्केट एक्सपर्ट, मोतीवाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट सर्विसेस

पत्ता: मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट सर्विसेस
टपरीकी चाय ब्लॉकच्या वर, शेवाळकर परिसर, यवतमाळ रोड, वणी
मोबाईल नंबर – 7743906960  (रोहित काकडे) 9823160229 (निखिल भोयर) 

हे देखील वाचा:

एक दिवशीय जम्बो ऑफर, साउंडबार अवघ्या 2999 रु. मध्ये

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.