वणीत ओबीसी समाजातर्फे मोटार सायकल जनजागृती रॅली
3 जानेवारीच्या ओबीसी मोर्चाबाबत जोमात नियोजन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: येत्या जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी येत्या 3 जानेवारीला ओबीसी समाजातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता ओबीसी समाजातर्फे शहरात मोटार सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
3 जानेवारी रोजी होणा-या मोर्चात ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या करिता आयोजकांतर्फे खेड्यापाड्यात जनजागृती केली जात आहे. त्याच अनुशंगाने आज वणी शहरात मोटर सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो मोटर सायकल धारक उपस्थित झाले होते. ही रॅली ओबीसी कार्यालयापासून तर विठ्ठलवाडी चौक, टिळक चौक, खाती चौक, शहीद भागतसिंग चौक, सर्वोदय चौक, छ. शिवाजी महाराज चौक, बस स्टॅन्ड चौक, जिजाऊ चौक येथे मार्ग गेली. रॅलीचा समारोप ओबीसी कार्यालयात पोहचून झाला. रॅलीनिमित्त पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
केंद्र सरकारद्वारा करण्यात येणा-या जनगणनेत एससी एसटी समाजाची स्वतंत्र जनगणना केली जाते मात्र 1948 पासून ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना बंद कऱण्यात आली आहे. ओबीसींची सुद्धा स्वतंत्र जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ओबीसी समाजातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन कऱण्यात आले आहे.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: