मार्की – मांगली ओपनकास्ट कोळसा खाणीसाठी 15 मे रोजी लोकसुनावणी

जितेंद्र कोठारी, वणी : झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथून जवळ मार्की- मांगली- II ओपनकास्ट कोळसा खाणीकरिता येत्या 15 मे रोजी पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने या लोकसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. 

Podar School 2025

वने व पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार यांची अधिसूचना दि. 14.09.2006 व सुधारीत अधिसूचना दि. 01.12.2009 अन्वये मे. यझदानी इंटरनॅशनल प्रा. लि. सातवा मजला, सी-विंग टॉवर्स चंद्रशेखरपूर, भुवनेश्वर- 751023, ओडिसा या खाजगी कंपनीला झरीजामणी तालुक्यातील मार्की-मांगली-II ओपनकास्ट कोळसा खाण प्रकल्प लीजवर देण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सदर कंपनीने 339.467 हे. क्षेत्रात एकूण 0.30 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या खुल्या कोळसा खाणीच्या प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्याकरिता म.प्र. नि. मंडळाकडे अर्ज सादर केला आहे. त्या अनुषंगाने दि. 15 मे 2023 रोजी मार्की-मांगली-II ओपनकास्ट कोळसा खाण प्रकल्प, सिक्युरिटी पोस्ट, रूईकोट, ता. झरी जामणी येथे सकाळी 11 वाजता पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रकल्पामुळे तालुक्यातील सावली, मुकुटबन, रुईकोट, पारडी ही गावे प्रभावित होणार आहेत. 

सदर कोळसा प्रकल्पाबाबत आक्षेप, विचार, टीका टिप्पणी 15 मे 2023 पूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी किंवा ईमेल द्वारे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय लोकसुनावणीच्या वेळीसुद्धा मौखिक व लेखी आक्षेप नोंदविता येणार आहे. सदर जाहीर जनसुनावणी ऑनलाईन पध्दतीने Webex platform वर सुध्दा घेण्यात येणार आहे. 

आक्षेप खालील पत्त्यावर नोंदविता येईल:

प्रादेशिक कार्यालय व उप प्रादेशिक कार्यालय

हाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उद्योग भवन

पहिला माळा,  बस स्टँण्ड समोर, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपूर

फोन नं.: 07172-251965 ईमेल: rochandrapur@mpcb.gov.ins rochandrapur@mpcb.gov.in

Comments are closed.