वणीत नऊ ऑगस्टला मेघना साने यांचा ‘कोवळी उन्हे’ नाट्यप्रयोग 

जैताई मंदिराच्या प्रांगणात रंगणार कार्यक्रम

0

वणी: चित्रपट व दूरदर्शन वाहिनीवरील सुप्रसिद्ध कलावंत मेघना साने यांच्या ‘कोवळी उन्हे’ या एकपात्री प्रयोगाचं आयोजन वणीत करण्यात आलं आहे.  वनिता समाजातर्फे येथील जैताई मंदिराच्या प्रांगणात दि. 9 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

सत्वपरिक्षा, तूच माझी आई, या मराठी चित्रपटसह दामिनी, बंदिनी या मालिकांमधून मेघना साने यांनी अविस्मरणीय भूमिका केल्या आहेत. कथा, काव्य आणि नृत्य याद्वारे ‘कोवळी उन्हे’ हा संस्कार व मूल्यांची जपणूक करणारा हा एक मनोरंजक कार्यक्रम आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

(हे पण वाचा: पावसाळ्यात डासांपासून करा बचाव)

या प्रयोगाचे महराष्ट्रासह, देश विदेशात प्रयोग झाले आहे. या कार्यक्रमाचा समस्त वणीकर रसिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन वनिता समाजाच्या अध्यक्षा भारती सरपटवार यांनी केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.