वणीतील दोन पोलीस अधिका-यांची पदोन्नतीवर बदली

मुकुंद कवाडे यांची नागपूर तर संदीप एकाडे यांची चंद्रपूरला बदली

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्हा वाहतूक उपशाखा वणी येथे सहा. निरीक्षक पदावर कार्यरत असलेले मुकुंद कवाडे यांना पदोन्नती मिळाली असून त्यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. तर वणी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले संदीप एकाडे यांची चंद्रपूर येथे पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने सुमारे 450 नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती दिली. यात वणीतील दोन पोलीस अधिका-यांचा समावेश आहे. मुकुंद कवाडे यांनी काही महिन्याआधी जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाचे नेतृत्व केले होते. त्यांचा हा काळ चांगलाच गाजला होता. मात्र 22 दिवसांमध्येच हे पथक बरखास्त करण्यात आले व त्यांना वाहतूक शाखेचा पदभार दिला होता. आता रिक्त झालेल्या ठिकाणी कोणाची वर्णी लागते याकडे शहराचे लक्ष लागले आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.