मुकुटबनमध्ये निर्जंतुकीकरणाला सुरूवात

ट्रॅक्टरच्या मदतीने गावात फवारणी सुरू

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन येथे आजपासून गाव निर्जंतुकीकरणास सुरुवात झाली आहे. संपूर्ण गावातील रस्त्याने फवारणी करून गाव निर्जुंतुकीकरण करण्याचे काम ग्राम पंचायतीद्वारा केले जात आहे.

मुकूटबन ग्रामपंचायतचे सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, ग्रामविकास अधिकारी कैलास जाधव यांनी गाव निर्जंतुक करण्याकरिता औषधी बोलावली. ट्रॅक्टरवर नोजल लावून गावातील संपूर्ण रोडने फिरवून निर्जंतुकरन करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. गावात पाच वॉर्ड असून पाचही वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत कर्मचारी स्वतः सोबत राहून संपूर्ण गाव निर्जंतुकरन करीत आहे.

सध्या गाव स्वच्छतेकडे ग्रामपंचायतने लक्ष दिले असून प्रत्येक वॉर्डातील नाल्या साफसफाई करणे सुरू आहे. ग्रामवासीयांना कोरोना विषाणूचे लागण होऊ नये याकरिता विविध उपाययोजना केली आहे. गावात कोरोना विषयी जनजागृती करण्यात येत आहे. जनतेला जनजागृतीचे गावात मोठे फलकही लावण्यात आले.

एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता गावातील भाजीपाला विक्रेत्यांना वेगवेगळे ठिकाण देजन गर्दी कमी करण्याचे कार्य केले आहे. गावात कोरोना प्रतिबंध ग्रामस्तरीय समिती स्थापन केली असून अध्यक्ष सरपंच लाकडे असून तलाठी, ग्रामविकास अधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक व पत्रकार असून ग्रामवासीयांना घरपोच सेवा अंतर्गत सदर समिती द्वारे अत्यावश्यक वस्तू घरपोच देण्याची व्यवस्थ केली आहे.

उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी गटविकास अधिकारी सुधाकर जाधव सहा गटविकास अधिकारी इसलकर यांनी सुद्धा गावात निर्जंतुकरण कोणत्या पद्धतीने करीत असल्याची पाहणी सुद्धा केली. गावाची योग्य ती काळजी घेण्याच्या कार्यात ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवक, पत्रकार यांचा सहभाग मोलाचे असल्याने गावात एकजूट असल्याने गावातील प्रत्येक समसेवर मात करता येत असल्याची प्रतिक्रिया सरपंच शंकर लाकडे उपसरपंच अरुण आगुलवार व ग्रामविकास अधिकारी कैलास जाधव दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.