सुशील ओझा, झरी: प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस झरी तालुक्यातर्फे मुकुटबन येथे शनिवारी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मुकुटबन येथील आदर्श हायस्कूल येथे सकाळी 11 ते 4 दरम्यान होणार आहे. तपासणीकरीता विविध वैद्यकीय विभागातील तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत. तसेच त्यावर उपाचार देखील करणार आहेत. हे शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात होत आहे.
या शिबिरात रुग्णांची आरोग्य तपासणी, रक्त तपासणी तसेच रोग आणि लक्षणांनुसार मोफत तपासणी केली जाणार आहे. तसेच ऩिदानानंतर रुग्णांना मोफत औषधी देखील दिली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या शिबिरात रुग्णांच्या हाडांची ठिसुळता तपासणीसाठी असलेली बीएमडी ही टेस्ट देखील केली जाणार आहे. नेत्र तपासणी आणि कानाच्या बहिरेपणावरही तपासणी केली जाणार असून रुग्णांना आवश्यकतेनुसार मशीन देखील मोफत दिली जाणार आहे. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग करणार आहेत.
या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र लोढा, डॉ. प्रेमानंद आवारी, डॉ. प्रीती लोढा, डॉ. वैद्य, डॉ. वीणा चवरडोल, आयुर्वेदाचार्य डॉ. राहुल खाडे, डॉ. विवेक गोफणे, सर्जरी तज्ज्ञ डॉ. अशोक कोठारी, डॉ. किशोर व्यवहारे, हृद्यरोग व मधुमेहासाठी डॉ. गणेश लिमजे, डॉ. अनिरुद्ध वैद्य, डॉ. पाटील, जररल फिजिशियन डॉ. रमेश सपाट, डॉ. महेश सूर, डॉ. दिलीप सावनेरे, डॉ. नईम शेख.
भूलतज्ज्ञ डॉ. शिरीष कुमरवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनील जुमनाके, डॉ. पवन राणे, डॉ. नीलेश ढुमणे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विकास हेडाऊ, डॉ. सुबोध अग्रवाल, डॉ. विजय खापने, दंतरोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुसळे, डॉ. मकरंद सपाट, डॉ. अमोल पदलमवार, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्वप्निल गोहोकार, डॉ. प्रीती खाडे, त्वचारोग तज्ज्ञ प्रशांत उरोडे, डॉ. पल्लवी पदलमवार, नाक कान घसा तज्ज्ञ डॉ. कमलाकर पोहे, डॉ. पंकज शिंदे हे रुग्णांची तपासणी करणार असून रुग्णांवर उपचार देखील करणार आहेत.
शिबिराविषयी बोलताना डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की…
झरी तालुका हा आदिवासी बहुल व मागास तालुका आहे. गरीबी, अंधश्रद्धा इत्यादी कारणांमुळे इथे अनेक रुग्णांना उपचार मिळत त्यामुळे त्यामुळे आजारात वाढ होते शिवाय उशीर झाल्याने अनेक रुग्णांना जीव ही गमवावा लागतो. त्यामुळे या परिसरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात रुग्णांच्या जवळपास शरिरातील प्रत्येक अवयव व प्रत्येक रोगांवर निदान आणि उपचार केला जाणार आहे.
या शिबिराला झरी तालुक्यातील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस झरी तालुक्यातर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हा प्रमुख प्रभाकर मानकर, तालुका प्रमुख संजय जंबे यांच्यासह विशाल ठाकरे, अमोल ठाकरे, गजानन लकशेट्टीवार, संतोष बरडे, विशाल पारशीव, संदीप धवणे, अंकुश नेहारे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लोढा हॉस्पिटलची चमू परिश्रम घेत आहे.