मुकुटबनचा ‘मामा तलाव’ झाला फूल

मासोळी, शिंगाळा आणि कमळाच्या व्यवसायिकांचे फुललेत चेहरे

0

संजय लेडांगे, मुकुटबन: झरीजामणी तालुक्याचा केंद्रबिंदू असलेल्या मुकुटबन येथील ब्रिटिशकालीन ‘मामा तलाव’ सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे शंभर टक्के फूल झाला आहे. परिणामी या ब्रिटिशकालीन मामा तलावावर अवलंबून असणारे व्यावसायिक आनंदीत होऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. तर यावर्षी उत्पन्नात मोठी भर पडणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहेत.

मागील काही दिवसांपासून परीसरात अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांसह मुकुटबन येथील ब्रिटिशकालीन ‘मामा तलावही’ तुडुंब फूल भरला आहेत. यादरम्यान दरवर्षी पावसाच्या प्रतीक्षेत असणारा ‘मामा तलाव’ सध्या ओरफ्लो झाला आहे. ब्रिटिशकालीन तलाव जंगलव्याप्त परिसरात निसर्गाने वेढलेल्या निसर्गरम्य परिसरात असून निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. साधारणतः 200 हेक्टरवर पसरलेल्या तलावावर मुकुटबन येथील तीनशे कुटुंब मासोळी, शिंगाडे आणि कमळाचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

सन 2010-11 मध्ये हा निसर्गरम्य ‘मामा तलाव’ पाण्याअभावी कोरडा पडला होता. त्यामुळे या तलावावर असणाऱ्यांचे व्यवसाय डबघाईस आले होते .निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या हा ब्रिटिशकालीन तलाव यावर्षी मात्र पावसाच्या पाण्याने फूल झाल्याने व्यावसायिकांच्या चेहऱ्यांवर हसू फुलले आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.