मुकुटबन येथे मीना बाजाराला सुरवात
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व मोठे गाव मुकुटबन येथे १२ मार्च पासून मीना बाजार भरला असून या मीना बाजाराला जत्रेचे स्वरूप आले आहे. तालुक्यात पहिल्यांदाच मीना बाजार भरल्याने लहान मुळापासून तर वयोवृद्ध पर्यंत या मीना बाजारात जाताना दिसत आहे. मीना बाजारात मौत का कुआ, आकाश झुला, झिकझ्याक झुला, लहान मुलांकरिता वॉटर बोट, व इतर अनेक प्रकारच्या झुल्यामुळे आकर्षण वाढले आहे.
चायनीस नास्ता, आकर्षक दुकाने, महिलकरीता ज्वेलरी चे दुकाने तसेच इतर अनेक दुकानासह इतर मनोरंजनाचे दुकान असल्याने तालुक्यातील जनतेची धाव सध्या मुकुटबन येथील मीना बाजाराकडे पाहायला मिळत आहे. मीना बाजारातील मौत का कुआ आकर्षण ठरत असून सायंकाळी ६ वाजतानंतर हे मीना बाजार भरतो ज्यामुळे तालुक्यातील कर्मचारी ,अधिकारी ,व्यापारी आपल्या कुटुंबासह मीना बाजारात आनंद घेताना दिसत आहे तर तरुण युवका, युवती सुद्धा या बाजारात जास्त प्रमाणात दिसत आहे.
मीना बाजारात आनंदावर विरजण पडू नये किंवा कोणतेही अनुचित प्रकार व पॉकेट मारी हाऊ नये याकरिता मीना बाजारात पोलिसांनी सतर्क राहणे सुद्धा गरजेचे आहे.