मुकुटबन पोलिसांची आरोग्य तपासणी
सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्हा पोलीस कल्याण योजने अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी, कर्मचारीसह त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये १५ मे रोज सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी पोलीस स्टेशन व संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यात आली होती. ठाणेदार गुलाब वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी व कुटुंबियांचे तपासणी करण्यात आली. तपासणीत शुगर, बीपी (ब्लड शुगर) व इतर तपासणी करण्यात आली.
४१ लोकांच्या तपासणीत काहींना बीपी तर दोन लोकांना शुगर असल्याचे आढळले. वयाच्या ३० वर्षानंतर प्रत्येक व्यक्तीने शरीराची तपासणी करणे आवश्यक असते. वाढत्या वयाप्रमाणे वेगवेगळ्या आजाराच्या प्रमाणात वाढ होते.तपासणी केल्याने मानवाच्या शरीरातील आजारा संबंधी माहिती मिळवून उपचार करण्यात सोपे जाते.
आरोग्य तपासणी करिता मुकुटबन येथील डॉक्टर जोगदंड, आरोग्य सेवक मेतपेलवार, सुवर्णा काळे, विजया परसावार व चालक गणपत इंगोले उपस्थित होते तर मदतीकरिता पोलीस ठाणेदार गुलाब वाघ सह संदीप सोयाम, उमेश कुमरे, प्रदीप कवरासे, प्रवीण ताडकोकुलवार, नीरज पातूरकर, सागर मेश्राम, मत्ते मुन्शी, अशोक नैताम सह कर्मचारी उपस्थित होते.