विवेक तोटेवार, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरा ते कुंभारखनी मार्गाने अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी मालकासह 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 28 जानेवारीला मध्यरात्री ही कार्यवाही करण्यात आली. त्यांच्याकडून 3 ब्रास रेतीसह सुमारे सव्वा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे्.
गुरुवारी दिनांक 28 जानेवारीला रात्री रेतीची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मुकुटबन पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी रेती भरलेले ट्रॅक्टर पकडण्याकरिता सापळा रचला. रात्री 2.15 वाजताच्या सुमारास कुंभरखणी ते साखरा मार्गाने 3 ट्रॅक्टर जात असताना पोलिसांना दिसले. त्या ट्रॅक्टरला थांबवून चालकांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे या रेतीची कोणतीही रॉयल्टी नसल्याचे आढळून आले.
सदर रेती चोरीची असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ट्रॅक्टर चालक व मालक असा सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भादंविच्या कलम 379, जमीन जमीन महसूल कायदा कलम 8 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. संतोष निखाडे वय 26, श्यामा चौधरी 38, गणेश कुडमेथे 22, मधुकर निखाडे 31, संजय कोकडे 42, राहुल चिडे 30 सर्व राहणार साखरा असे आरोपींचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी 3 ट्रॅक्टर किंमत 12 लाख रुपये व 3 ब्रास रेती किंमत 18 हजार असा एकूण 12 लाख 18 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कार्यवाही ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक नैताम, प्रवीण तालकोकुलवार, जितेश पानघाटे, नीरज पातूरकर व पुरुषोत्तम घोडाम यांनी केली .
मुरुम चोरट्यांवर कारवाई कधी?
उमरखेड येथील नायब तहसिलदार व तलाठी यांच्यावर रेती तस्करंणी जीवघेणा चालू हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयन्त केला. रेती माफियांच्या मुजोरीमुळे सध्या जिल्ह्यात रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात झाली आहे. झरी तालुक्यात मुकुटबन सह अडेगाव, पिंपरड, कोसारा, खातेरा, मांगली, ल पांढरकवडा, झरी, पाटण, जामनी व इतर गावातील ट्रॅक्टर मालका कडून रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रेती व मुरूमची चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यांच्यावरही कारवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा: