मुकुटबन येथे विदर्भस्तरीय शेतकरी विद्युत परिषदेचे आयोजन
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध समस्या बाबत मुकुटबन येथे विदर्भस्तरीय शेतकरी विद्युत परीषदचे आयोजन करण्यात आले आहे. २४ डिसेंबरला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी नेते नाना पटोले, राजू शेट्टी, चंद्रकांत वानखेडे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन असून शेतात बोअरवेल ,विहिरी व इतर साधन आहे. परंतु कृषीपंप सिंचनाकरिता व वरील सुविधेकरीता वीज पुरवठा नियमित होत नसल्याने शेतकऱ्यांना आपले पीक वाचवणे कठीण झाले आहे. शेतक-यांच्या हिताचा लोअर पैनगंगा प्रकल्प सुद्धा वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. महावितरण कंपनीच्या वेळापत्रकाप्रमाणे शेतकऱ्यांच्या कृषिपंपाना ८ तास वीज पुरवठा करणे आवश्यक आहे परंतु कंपनीच्या वेळापत्रक वारंवार बदलत असल्याने शेतकऱ्यांना वीज पुरवठा देऊ शकत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्याचे कृषीपंप चालवण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे.
शासनाकडून शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्याकरिता जे अनुदान दिल्या जाते त्या अनुदानाचा हिशोब शेतकऱ्यांना माहीत होऊ देत नाही. उलट शेतकऱ्यांना जास्तीचे बिल भरावे लागत आहे ज्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक मोठे नुकसान होत आहे. वरील सर्व शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्याच्या तसेच शासनाचे लक्ष केंद्रित करून शासनाने याकडे त्वरित उपाययोजना कराव्या याकरिता सर्व शेतकरी बांधवानी एकत्र येऊन परिषदेच्या माध्यमातून लढा देऊन व सर्व समस्या ठरावात घेऊन ठराव पास करन शासनाला सादर करणार आहे.
ठरावात शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी,भारनियम बँड करण्यात येऊन वीज बिल माफ करण्यात यावे, संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळ दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा,वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजना करावे, लोअर निम्मं पैनगंगा प्रकल्प सुरू करण्यात यावा,कोळसा खान व सिमेंट प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांना रोजगार देण्यात याव्या या मागणीकरिता परिषदेचे आयोजन संजय देरकर अध्यक्ष शेतकरी संवाद न्यायाचा व सचिव राजीव येल्टीवार यांनी केला आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे तर उदघाटक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राहणार असून प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार वामनराव चटप, शेतकरी नेते खासदार नाना पटोले, माजी आमदार वामनराव कासावार, समाज कल्याण सभापती अरुनाताई खंडाळकर तर प्रमुख उपस्थिती देवराव धांडे शेतकरी नेते, संतोष कुचनकर कृ उ बा समिती सभापती वणी, प्रा संजय लव्हाळे, नेताजी पारखी,संदीप बुरेवार सभापती कृ उ बा समिती झरी, नागोराव उरवते उपसभापती प स झरी, प्रकाश म्याकलवार मा सभापती कृ उ बा समिती झरी, भुमरेड्डी बाजनलावार मा सभापती प स झरी, सुनील नांदेकर मा अध्यक्ष वसंत जिनिग वणी, रामन्ना येल्टीवार मा प स झरी राहणार आहे.
सदर परिषदेत शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अनिल गोवरदीपे, निलेश येल्टीवार,संजय उरकुडे, हरिदास गुर्जलवार, दिलीप पायघन, राजीव आस्वले, करमचंद बघेले, सुनील ढाले, संभा आगीरकर यांनी केले आहे.