मुंगोली, माथोली, जुगाद, साखरा, कोलगाव येथे गरजूंना मदत
न्यू चॅरिटेबल ट्रस्ट वआयटकचा पुढाकार
बहुगुणी डेस्क, वणी: मुंगोली, माथोली, जुगाद, साखरा व कोलगाव येथे न्यू चॅरिटीबल ट्रस्ट, आयटक युनियनच्या माध्यमातून व सरपंच यांच्या सहभागातून धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. सुमारे शंभर गरजूंना कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल एवढी धान्याची किट यावेळी देण्यात आली.
माथोली, मुंगोली. जुगाद ,साखरा व कोलगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग अडकला आहे. सध्या लॉकडाऊन मुळे परत गावी जाऊ शकत नाही व काम बंद असल्याने त्यांच्यावर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे न्यू चॅरिटीबल ट्रस्ट व आयटक युनियनच्या माध्यमातून व गावातील सरपंचाच्या सहभागाद्वारे जवळ जवळ शंभर गरजवंताना पंधरा दिवस पुरेल एवढा धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
न्यू लाईफ चॅरिटीबल ट्रस्टचे अध्यक्ष हृदय अदुडुवार, स्टिफन रमिल्ला, बंटी अदुडुवार, अंकित आडेपली, राजेश गजलवार, संदीप डोगारी, अपूर्व वासेकर, अनिकेत तेलंग, आयटक युनियनचे सुदर्शन तेलंग, किशोर ताजने, वैद्यकीय अधिकारी अभिनय कोहळे, मुंगोली सरपंच रुपेश ठाकरे, साखरा सरपंच नभाताई नांदे, माथोंली सरपंच प्रवीण पिंपळकर, कोलगाव सरपंच त्रिवेणीताई उपरे व सोबतच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.