बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळी निमित्त जैताई मंदिराच्या प्रांगणात शनिवारी संध्याकाळी स्वर दीपोत्सव या संगीतमय मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ठिक 7 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. स्थानिक कलावंत यात मराठी भावगीत, भक्तीगीत, लोकगीत, सुगम संगीत सादर करणार आहेत. मृदूल कुचनकर, राधा कुचनकर, अंकिता भोयर, सोनम सुरपाम, भागेश्री पोटदुखे, त्रंबक जाधव हे गायक कलावंत असून ढोलकची साथ अक्षय करसे, किबोर्ड निखिल जिरकुंटवार, ऑक्टोपॅड अमोल दुधलकर तर मायनरची साथ अतुल डफ करणार आहे. अभय पारखी यांचे बहारदार निवेदन या कार्यक्रमाला राहणार आहे. संगीत संयोजन अभिलाष राजूरकर यांचे आहे. या कार्यक्रमाचे आयोजन स्वरसाज एन्टरटेन्मेंट गृप वणी व एसएम कलेक्शन वणी द्वारा करण्यात आले आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने व सहकुटुंब हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.