मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

विविध सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन सादर

0

बंटी तामगाडगे, वणी: मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाचं औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. वणीमध्ये विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना घेऊन दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या शहीद मेजर कौस्तुभ राणे तसेच  मराठा आरक्षणाकरिता शहिद झालेल्या 27 बांधवांना आदरांजली वाहण्यात आली.  त्यानंतर शिवतीर्थ ते एसडीओ कार्यालयपर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा कार्यालयात पोहोचला. तिथे मुख्यमंत्र्यांना एसडीओंना मराठा आरक्षण आणि विविध मागणींसाठी निवेदन देण्यात आलं.

कुठल्याही इतर समाज घटकाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा, धनगर व मुस्लिम समाजला आरक्षण लागू करावे. ओबीसी कुणबी व मराठा समाजच्या विध्यार्थीकरिता तालुका व जिल्हानिहाय स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात यावे. मराठा ठोक मोर्चा दरम्यान समजतील युवकांवर लावण्यात आलेले गुन्हे तत्काल मागे घेण्यात यावे. अट्रोसिटि कायदयाचा दूरोपयोग होणार नाही याकरिता दुरुस्ती करण्यात यावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांची व्याप्ती वाढून समाजतील युवकांना ऊधोग उभारणी करिता आर्थिक मदत करण्यात यावी. अरबी समुद्रातील शिवस्मारक तत्काळ पूर्ण करावे .शेतकऱ्यांना डॉ .सॉमिणाथन आयोगाच्या सर्व शिफारशी त्वरित लागू करण्यात याव्या. ओबीसी वर्गातील विध्यार्थीसाठी sc /st च्या धर्तीवर तालुका व जिल्हा निहाय वसतिगृह उभारण्यात यावी. अशा अनेक मागणी चे निवेदन देण्यात आले.

यावेळी अजय धोबे संभाजी ब्रिगेड  जिल्हा अध्यक्ष पूर्व , मंगेश खामनकर मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष , विवेक ठाकरे संभाजी ब्रिगेड वणी  तालुका अध्यक्ष , अभय पानघाटे , पांडुरंग मोडक , संदीप रिंगोले , शंकर निब्रड , शेखर व्हराटे , रुशी कांत पेचे , राजेश बोडखे कपील रिंगोले , दत्ता डोहें , मारोती जीवतोडे , प्रवीण घूगूल , अमोल टोंगे , नरेन्द्र गायकवाड , जगदीश ढोके , आशिष डोईजड , प्रदीप बोरकुटे , संजय गोडे , प्रशांत देरकर , प्रशांत बोबडे , संतोष म्हसे , दिलीप भोयर व सर्व संभाजी ब्रिगेड , मराठा सेवा संघ व बहुजनवादी विचार च्या संघटना चे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात  उपस्तीत होते.

शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं ‘ महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….

Leave A Reply

Your email address will not be published.