विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर गावात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे. स्वयंसेविका म्हणून गावातीलच महिलांतर्फे येथील नागरिकांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना कोरोनापासून वाचण्यासाठी मार्गदर्शनसुद्धा करण्यात येत आहे. त्यासाठी राजूर येथे 6 पथकं तयार करण्यात आलीत. प्रत्येकी 2-2 गट तयार करण्यात आलेत. स्वयंसेविका तपासणी व मार्गदर्शन करत आहेत.
दिवसेंदिवस कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात आपले हातपाय पसरत आहे. त्यावर मात करण्यासाठी वारंवार हात धुवावेत. शारीरिक अंतर ठेवावे. मास्कचा वापर करावा. ताप, सर्दी, खोकला, शरीरात अशक्तपणा जाणवणे, ऑक्सिजन कमी असणे अशी लक्षणे आढळल्यास काळजी घ्यावी. “माझं कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेतील व्यक्तींना याची माहिती देऊन त्वरित टेस्ट करून घ्याव्यात.
जितक्या लवकर टेस्ट केली जाईल व तितक्या लवकर योग्य औषधोपचार आणि विलगिकरण करून प्रसार रोखता येतो. याकरीता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजूर ग्रामपंचायत येथील नवीन रुजू झालेले प्रशासक राजेश निरे यांनी केले आहे. ” माझे कुटुंब …माझी जबाबदारी” मोहिमेत महेश्वरी राजू निरडावार, पौर्णिमा संजय राजनलवार, मनीषा नर्सय्या जेडावार, अश्विनी अशोक राजनलवार, दुर्गा विनोद येलगुलवार व अमृता रमेश शिरपूरकर या स्वयंसेविका खूप परिश्रम घेत आहेत.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)