न.प. शाळा क्र. 8 मध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा संपन्न

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

Jadhao Clinic

पुरूषोत्तम नवघरे, वणी: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नगरपरिषद वणी तर्फे चित्रकला  व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 8 येथे शुक्रवारी दिनांक 12 ऑगस्टला ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेआधी मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक शाळेतून प्रभात फेरी देखील काढण्यात आली.

चित्रकला व निबंध स्पर्धा ही वर्ग 1 ते 5 व वर्ग 6 ते 8 अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेसाठी नगरपरिषदेच्या प्रत्येक शाळेमधून प्राथमिक गटामधून 2 विद्यार्थी व वरिष्ठ प्राथमिक गटातून 2 विद्यार्थी प्रत्येक स्पर्धेसाठी पाठविण्यात आले होते. या स्पर्धेचे संयोजक म्हणून संजय पिदुरकर व जयप्रकाश सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

स्पर्धेत विजेता ठरणा-या विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टला नगर पालिकेच्या प्रांगणामध्ये आयोजित सोहळ्यात बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक किशोर चौधरी, अविनाश तुंबडे, देवेंद्र खरवडे यांच्यासह नगर पालिकेच्या शिक्षकांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा:

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये आजपासून ‘फ्रीडम’ ऑफरला सुरुवात

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!