राजू उंबरकर यांच्या घरी रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार

16 वर्षाची परंपरा कायम, शेकडो महिलांची उपस्थिती

Jadhao Clinic

जितेंद्र कोठारी, वणी: मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या घरीही रक्षाबंधनाची लगबग पाहायला मिळाली. गेल्या 16 वर्षापासून ग्रामीण भागातील महिला राखी पौर्णिमेच्या दिवशी राजू उंबरकर यांच्या घरी येऊन मोठ्या आपुलकीने त्यांना राखी बांधतात.

यावर्षी वणी उपविभागात मागील अनेक दिवसापासून सतत पूर परिस्थिती निर्माण झालेली आहेत. अशा पुर सदृष्ट परिस्थितीमध्ये गावाला पाण्याचा वेळा असताना सुद्धा ग्रामीण भागातील शेकडो महिला  मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना राखी बांधण्याकरिता वणीत त्यांच्या घरी पोहोचल्या.

घरी आलेल्या शेकडो महिलांना बघून राजू उंबरकर काही वेळेकरिता भावूक झाले होते. यावेळी या संपूर्ण महिलांचे स्वागत राजू उंबरकर यांच्या पत्नी तृप्ती उंबरकर यांनी केले. त्यानंतर मोठ्या उत्साहात सामूहिक रक्षाबंधन सोहळा राजू उंबरकर यांच्या घरी पार पडला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्ष अलका टेकाम (त्रिंबके), महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार तसेच वणी शहर अध्यक्ष शिवराज पेचे, वैशाली तायडे, जोती मेश्राम यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हे देखील वाचा:

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये आजपासून ‘फ्रीडम’ ऑफरला सुरुवात

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!