वणीत उद्याला नगर परिषद अंतर्गत विविध कामाचे भूमिपूजन

विविध योजनेअंतर्गत संंध्याकाळी 6 ते 8 दरम्यान कार्यक्रमांचे आयोजन

0

विलास ताजने, वणी: वणी नगर परिषद द्वारा दि. ३ रविवारला विविध प्रभागातील विकास कामाचा भूमिपूजन सोहळा सकाळी आयोजित केला आहे. विशेष रस्ता अनुदान, घनकचरा व्यवस्थापन, चौदावा वित्त आयोग, अग्निसुरक्षा अभियाना अंतर्गत सदर कामे करण्यात येत आहे. वणीतील विविध प्रभागातील सदर कामाच्या ठिकाणी संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

सदर भूमिपूजन सोहळ्याचे उद्दघाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांचे हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तर विशेष अतिथी म्हणून वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे  उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला नगर परिषदचे मुख्याधिकारी संदीप बोरकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस दिनकर पावडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय पिदूरकर, शहर अध्यक्ष रवि बेलूरकर, प्रदेश सदस्य विजय चोरडिया, पंचायत समिती उपसभापती संजय पिंपळशेंडे, नगर परिषद उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, न.प. आरोग्य सभापती शालीक उरकुडे, बांधकाम सभापती राकेश बुग्गेवार तसेच नगर परिषदचे सर्व सदस्य, स्थायी समितीचे सदस्य यांच्यासह नामनिर्देशीत सदस्य महादेव खाडे, चंद्रकांत फेरवानी उपस्थित राहणार आहे.

याप्रसंगी वणी शहरातील प्रभाग क्र. १ मध्ये नांदेपेरा रोड ते वरोरा ( रेल्वे स्टेशन पर्यंत) १२ मीटर डीपी रोडचे काम करणे, प्रभाग क्र.१३ मधील दीपक टॉकीज ते जंगली पीरबाबा दर्ग्या पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे,  प्रभाग क्र. ८ मधील खाती चौक ते तुटी कमान पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, प्रभाग क्र. ३ मधील वरोरा रोड साईबाबा दरबार ते घुगूस रोडवरील टोल नाक्या पर्यंत डीपी रोडचे बांधकाम करणे, प्रभाग क्र. ६ मधील काठेड चौक ते सावरकर चौक, प्रभाग क्र. १० मधील गंगशेट्टीवार ते गोरंटीवार यांच्या घरापर्यंत पाईप ड्रेनचे बांधकाम करणे, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कंपोस्ट डेपोवर विविध कामे करणे, जत्रा मैदानावरील मटण मार्केटमध्ये स्टॉलर हाऊसचे काम, अग्निशमन कर्मचारी निवारा बांधकाम यासह गणेशपूर मार्गावरील नेहरू बगीचा विकास करणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. वणीकरांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.