पालिका अभियंत्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश

राज्य माहिती आयुक्तांचा आदेश, माहिती न देणे भोवले

0

सुनील पाटील, वणी: माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील चोपणे यांनी शहरातील लाॅन व मंगल कार्याल्याच्या परवानगी व अटी शर्ती बाबत पालीकेला माहिती मागीतली होती. ती अद्याप पुरविण्यात आली नाही. या प्रकरणी राज्य माहिती आयुक्तांनी अभियंता मयूर दहिकर यांच्यावर 25 हजार रुपये शास्ती व शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेशीत केल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

वणी शहरात अनेक मंगल कार्यालये व लाॅन्स आहेत; मात्र सुविधेचा खूप अभाव आहे. तसेच वाहनतळ याबाबत सातत्याने नागरीक तक्रारी करतात. मात्र योग्य निर्णय पालिका प्रशासन घेताना दिसत नाही. याकरिता माहिती अधिकार कार्यकर्ता सुनील चोपणे यांनी नगर पालिका प्रशासनाला माहिती मागीतली असता ती पुरविण्याचे सौजन्य पालीकेने दाखविले नाही. यामुळे राज्य माहिती आयुक्तांकडे अपिल करण्यात आले. त्यावर राज्य माहिती आयुक्तांनी 29 मे ला आदेश पारित केला.

राज्य माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी याप्रकरणी सर्व बाबी तपासल्यात. नंतर 29 मे 2020ला आदेश पारीत करीत माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 7 [1] नुसार संबधीत माहिती अधिकारी मयूर दहिकर यांनी विहित मुदतीत उपलब्ध व देय ठरत असलेल्या माहितीचे अपीलार्थीस प्रदान केले नाही म्हणून 25 हजार रुपये शास्ती व शिस्तभंग कारवाईची शिफारस केली. सोबतच आदेश पारित झाल्याच्या 30 दिवसांच्या मुदतीत अपिलार्थीस अद्ययावत माहिती पुरवावी व तसा अनुपालन अहवाल 30 दिवसाच्या मुदतीत आयोगास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

प्रथम अपिलीय अधिकारी मयूर दहिकर यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मागीतलेली माहिती व ती पुरविण्या संदर्भात त्यावेळी कर्तव्यावर दुसरेच प्रथम अपिलीय अधिकारी असल्याचे स्पष्ट करीत राज्य माहिती आयुक्तांकडे दाद मागीतली आहे.

संदीप बोरकर
मुख्याधिकारी, नगर परिषद वणी

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.