विवेक तोटेवार, वणी: वणी नगर पालिकेच्या विविध विषय समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया आज बुधवारी पार पडली. ही निवडणूक बिनविरोध पार पडली. उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यात नगराध्यक्ष व गटनेते तारेंद्र बोर्डे यांनी नवीन चेह-यांना संधी दिली आहे.
नगर पालिका विषय समितींच्या सभापतींचा कार्यकाळ संपला होता. त्यामुळे आज न.प. सभागृहातील विशेष सभेत स्थायी व विषय समित्यांचे गठण करण्यात आले. यात शालिक उरकुडे, आरोग्य सभापती, राकेश बुग्गेवार-बांधकाम सभापती, रंजना झाडे-शिक्षण सभापती, प्रीती बिडकर-जलपूर्ती सभापती, मायाताई ढुरके-महिला बालकल्याण सभापती तक मंजुषा झाडे-महिला बालकल्याण उपसभापती यांची वर्णी लागली आहे.
यात स्थायी समितीतील रंजना झाडे यांना सभापतीपदी निवड झाली असून इतर सर्व नवीन चेहरे आहेत. तर स्थायी समिती सदस्य मंजुषा झाडे, अक्षता चव्हाण, विजय मेश्राम यांची निवड झाली आहे.
विकासकामांना आणखी वेग येण्यासाठी नव्या चेह-यांना संधी: तारेंद्र बोर्डे
नगर पालिकेच्या विकासासाठी आम्ही नेहमी कटीबद्ध राहिलो आहे. नवीन चेह-यांना संधी मिळाल्यास आणखी जोमाने काम करता येईल हा विश्वास असल्याने यावेळी नवीन चेह-यांना संधी देण्यात आली आहे. अशी प्रतिक्रिया ‘वणी बहुगुणी’शी बोलताना दिली.