नाटिकेद्वारा शिक्षिकांनी दिला स्त्रीमुक्तीचा नारा
देवेंद्र खरवडे, वणी: स्त्री ही पुरुषांपेक्षा कुठेही कमी नसुन आजच्या घडीला पुरुषांच्या खांद्याला धक्का मारुन समोर गेली आहे. तेव्हा फक्त 8 मार्चला महिला दिन साजरा न करता वर्षातील संपूर्ण दिवस स्त्रीयांनी महिला दिन समजावा असे प्रतिपादन डॉ. संध्या पवार यांनी केले. महिला व बालकल्याण समिती नगर परिषद, वणी द्वारा आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
याप्रसंगी नगर परिषद वणी अंतर्गत शाळांमध्ये कार्यरत शिक्षिकांनी नाटिका सादर केली, यामधून महिलासबलीकरणाचा संदेश देण्यात आला. शिवाय अनाथ मुलींना दत्तक घेणाऱ्या महिलांचा नगर परिषदेकडून सत्कार देखील करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संध्या पवार होत्या. तर अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी संदिप बोरकर तथा सर्व महिला सभापती व नगरसेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापिका उमा राजगडकर, सिंधुताई गोवारदिपे,मीना काशीकर, रजनी पोयाम, वंदना परसावार, वेणूताई गाऊत्रे, मंगला पेंदोर, शुभांगी वैद्य, गीतांजली कोंगरे व दर्शना राजगडे या शिक्षिकांनी सहभाग घेतला.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…